मुंबई - राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल आज (बुधुवार) जाहीर झाला. यामध्ये मुंबई महानगरपालिकेच्या शाळांमधील दहावीच्या निकालाच्या टक्क्यांमध्ये प्रचंड वाढ पाहायला मिळाली. यावर्षी पालिकेच्या शाळांचा निकाल 93.25 टक्के लागला आहे. मागील वर्षांपेक्षा 40 टक्क्यांनी निकालात वाढ झाली आहे.
10 वीचा निकाल: मुंबई महापालिका शाळांच्या निकालात 40 टक्क्यांनी वाढ, 93.25 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण - मुंबई महापालिका शाळा न्यूज
राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल आज (बुधुवार) जाहीर झाला. यामध्ये मुंबई महानगरपालिकेच्या शाळांमधील दहावीच्या निकालाच्या टक्क्यांमध्ये प्रचंड वाढ पाहायला मिळाली.
2018 मध्ये मुंबई महापालिकेच्या शाळांचा निकाल 73 टक्के इतका लागला होता. तर मागील वर्षी (2019) पालिका शाळांचा निकाल 20 टक्क्यांनी घसरत 53.14 टक्के लागला होता. यावर्षी मात्र, त्यात कमालीची वाढ पाहायला मिळाली. यंदा मुंबई महापालिकेच्या 49 अनुदानित व 161 विनाअनुदानित अशा एकूण 210 माध्यमिक शाळांमधून दहावीच्या परिक्षेसाठी 13 हजार 637 विद्यार्थी परिक्षेला बसले होते. त्यापैकी 12 हजार 716 विद्यार्थी उत्तीर्ण झाल्याने पालिका शाळांमधील 93.25 टक्के विद्यार्थी पास झाले आहेत.
कसा घसरला होता टक्का -
पालिका शाळेचा 2016 मध्ये दहावीचा निकाल 76.97 टक्के लागला होता. 2017 मध्ये झालेल्या दहावीच्या परीक्षेत महापालिका शाळांचा निकाल 68.91 पर्यंत घसरला होता. 2018 मध्ये या निकालात 5 टक्क्यांची वाढ होऊन 73.81 टक्के निकाल लागला होता. मागीलवर्षी 2019 मध्ये मात्र 53.14 टक्के निकाल लागला असून 2018 या वर्षांपेक्षा 20 टक्क्यांनी पालिका शाळांचा निकाल घसरला आहे. मागील वर्षांपेक्षा यावर्षी निकालात 40 टक्क्यांनी वाढ पाहायला मिळाली आहे.