महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Doctor Saved Workers Life: तीक्ष्ण रॉड शरीरातून काढून पालिका डॉक्टरांनी वाचवले कामगाराचे प्राण - removing sharp rod from body

एका कामगाराच्या छातीजवळ तीक्ष्ण रॉड शिरून ( sharp rod inserted near worker chest ) तो गंभीर जखमी झाला होता. वांद्रे येथील बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या के. बी. भाभा महानगरपालिका रुग्णालयातील ( K B Bhabha BMC Hospital ) वैद्यकीय तज्ज्ञांनी या गंभीर जखमी कामगारावर तातडीने उपचार करून त्याचे प्राण वाचवले ( BMC Doctor Saved Workers Life ). आठवडाभराच्या वैद्यकीय देखरेखीनंतर या कामगाराला रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली असून दोन ते तीन आठवड्यांच्या विश्रांतीनंतर हा रुग्ण पूर्णपणे बरा होणार आहे.

sharp rod inserted near worker chest
कामगाराच्या शरीरात शिरलेला रॉड

By

Published : Aug 7, 2022, 9:03 PM IST

मुंबई:झाडावरून कुंपणावर कोसळलेल्या एका कामगाराच्या छातीजवळ तीक्ष्ण रॉड शिरून ( sharp rod inserted near worker chest ) तो गंभीर जखमी झाला होता. वांद्रे येथील बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या के. बी. भाभा महानगरपालिका रुग्णालयातील ( K B Bhabha BMC Hospital ) वैद्यकीय तज्ज्ञांनी या गंभीर जखमी कामगारावर तातडीने उपचार करून त्याचे प्राण वाचवले ( BMC Doctor Saved Workers Life ). आठवडाभराच्या वैद्यकीय देखरेखीनंतर या कामगाराला रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली असून दोन ते तीन आठवड्यांच्या विश्रांतीनंतर हा रुग्ण पूर्णपणे बरा होणार आहे.

रॉड तरुणाच्या छातीत शिरला -यासंदर्भात सविस्तर माहिती देताना महानगरपालिकेच्या प्रमुख वैद्यकीय अधीक्षक डॉ. विद्या ठाकूर यांनी सांगितले की, २६ जुलै २०२२ रोजी सकाळी ९.३० वाजेच्या सुमारास वांद्रे परिसरात मजुरी काम करताना एक २२ वर्षीय तरुण कामगार झाडावर चढला होता. तोल गेल्याने हा मजूर झाडावरून कोसळून खाली असलेल्या कुंपणावर पडला. कुंपणाच्या भिंतीवर लावलेल्या संरक्षक जाळीतील टोकदार बाण असलेली रॉड या तरुणाच्या छातीत घुसली. उंचावरून हा तरुण पडल्याने रॉड देखील मोडली आणि त्याच अवस्थेत रक्तबंबाळ होऊन तो जमिनीवर कोसळला. या कामगाराच्या सहकाऱ्यांनी त्याला तातडीने नजीकचे रुग्णालय म्हणून बृहन्मुंबई महापालिकेच्या वांद्रे येथील के. बी. भाभा रुग्णालयात दाखल केले. या तरुणाची रक्तबंबाळ अवस्था आणि गंभीर स्थिती पाहता डॉक्टरांनी तातडीने सदर कामगारावर शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला.


धोक्याच्या अवस्थेतून बाहेर काढले -शस्त्रक्रियेपूर्वी एक्सरे तपासणी करण्यात आली. त्यात आढळले की, जखमी व्यक्तीच्या छातीजवळ घुसलेली तीक्ष्ण रॉड सुदैवाने फुप्फुसांपर्यंत पोहोचली नव्हती, त्यामुळे फुप्फुसांना इजा झाली नाही. मात्र एक बरगडी तुटली होती आणि रक्तस्राव होत असल्याने या कामगाराची प्रकृती गंभीर होती. भूलतज्ञ डॉ. वरुण नाईक आणि डॉ. सोनाली कागडे यांनी कौशल्यपूर्वक रुग्णाला भूल दिली आणि त्यानंतर तातडीने शस्त्रक्रिया सुरू करण्यात आली. शल्यचिकित्सा विभागाचे वरिष्ठ सल्लागार डॉ. विनोद खाडे, डॉ. अमीत देसाई, डॉ. श्रद्धा भोने तसेच परिचारिका मानसी सरवणकर, रेश्मा पाटील यांच्या पथकाने सुमारे तासभर शस्त्रक्रिया करून रॉड यशस्वीपणे बाहेर काढून या कामगाराला धोक्याच्या अवस्थेतून बाहेर काढले असे डॉक्टर ठाकूर यांनी सांगितले.


कामगाराच्या प्रकृतीत सुधारणा-कामगाराच्या शरीरातील रॉड बाहेर काढल्यानंतर खोलवर असलेल्या जखमेमुळे फुप्फुसांजवळ आणि हृदयाजवळ अंतर्गत रक्तस्राव जमा होऊ नये तसेच हवा भरली तर ती बाहेर काढता यावी यासाठी नळी (inter coastal tube) टाकण्यात आली. अतिशय कठीण अशी ही शस्त्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण झाल्यानंतर या रुग्णास संपूर्ण एक दिवस अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले होते. उपचारास चांगला प्रतिसाद मिळू लागल्यानंतर या रुग्णास सर्वसाधारण कक्षात स्थलांतरित करण्यात आले. तसेच सुमारे आठवडाभराच्या वैद्यकीय उपचारानंतर आणि योग्य आहार दिल्यानंतर प्रकृती सुधारल्याने हा रुग्ण आता घरी परतला असून त्यास दोन ते तीन आठवडे पूर्णतः विश्रांतीचा वैद्यकीय सल्ला देण्यात आला आहे, अशी माहिती या रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. संजय पाटील यांनी दिली आहे.

हेही वाचा-Human ​Flying Drone : माणसाला घेऊन उडणारा ड्रोन पाहिलाय का?; 'येथे' झाली यशस्वी चाचणी

ABOUT THE AUTHOR

...view details