मुंबई - महापौर पदाचा सस्पेन्स संपला असून किशोरी पेडणेकर यांच्या नावाची अधिकृत घोषणा शिवसेनेतर्फे करण्यात आली आहे. तसेच उपमहापौरपदी सुहास वाडकर यांचे नाव पक्षातर्फे जाहीर करण्यात आले. स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या नावाबद्दल शिवसैनिकांमध्ये नाराजीचा सूर असल्याने त्यांचा पत्ता कापला असल्याची माहिती मिळत आहे.
मुंबई महापौरपदाकरता शिवसेनेकडून किशोरी पेडणेकर तर, उपमहापौरपदी सुहास वाडकर - किशोरी पेडणेकर
महापौर पदाचा सस्पेन्स संपला असून किशोरी पेडणेकर यांच्या नावाची अधिकृत घोषणा शिवसेनेतर्फे करण्यात आली आहे. तसेच उपमहापौरपदी सुहास वाडकर यांचे नाव पक्षातर्फे जाहीर करण्यात आले आहे.
आज (सोमवारी) पार पडलेल्या स्थायी समितीच्या बैठकीला अध्यक्ष यशवंत जाधव गैरहजर असल्याने महापौर पदाबद्दल निर्णय पडद्यामागेच होता. जाधव यांच्या गैरहजेरीमुळे नगरसेवक रमेश कोरगावकर यांनी स्थायी समितीची बैठक पार पाडली.
यशवंत जाधव महापौर पदाच्या शर्यतीत होते. मात्र, स्थायीच्या बैठकीत ते गैरहजर राहिले होते. ते 'मातोश्री'वरील बैठकीत उपस्थित होते अशी माहिती मिळत आहे. यामुळे पेडणेकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले असून उपमहापौरपदी सुहास वाडकर यांचे नाव पक्षातर्फे घोषित करण्यात आले आहे.