मुंबई - मुंबईत गेले पावणे दोन वर्षे कोरोनाचा प्रादुर्भाव आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईत अनेक निर्बंध लावण्यात आले आहेत. यामुळे मुंबई महापालिकेच्या (Mumbai Municipal Corporation General Assembly) महासभा ऑनलाइन पद्धतीने सुरू होत्या. कोरोनाचा प्रसार आटोक्यात असल्याने सोमवारी (२२ नोव्हेंबरपासून) म्हणजेच तब्बल २० महिन्यानंतर पालिकेची पहिली सभा प्रत्यक्ष सभा होणार आहे. ही सभा बाबासाहेब पुरंदरे यांच्या मृत्यूमुळे तहकूब होणार असली तरी यानंतर होणाऱ्या सभा प्रत्यक्ष घेण्यासाठी पालिकेने जागांची शोधाशोध सुरू केली आहे.
कोरोनाच्या प्रसारामुळे ऑनलाईन सभा
मुंबईत गेल्या वर्षी मार्च महिन्यात कोरोना विषाणूचा पहिला रुग्ण आढळून आला होता. त्यानंतर रुग्णसंख्या झपाट्याने वाढू लागण्यात लॉकडाऊन लावण्यात आला. गेल्या पावणे दोन वर्षात कोरोनाच्या दोन लाटा येऊन गेल्या. या दोन्ही लाटा थोपण्यात पालिका आणि राज्य सरकारला यश आले आहे. कोरोनाचा प्रसार आटोक्यात असल्याने दुसऱ्या लाटेनंतर अनेक निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. यामुळे मुंबईतील सर्व व्यवहार सुरळीत सुरू होत आहेत. मुंबई महापालिकेची १७ मार्च २०२० ला शेवटची प्रत्यक्ष सभा झाली होती. तेव्हापासून गेले पावणे दोन वर्षे ऑनलाइन पध्दतीने सभा होत होत्या. या सभांमध्ये नगरसेवकांना सहभाग घेता येत नव्हता. इंटरनेट नसणे, आवाज न येणे, लॉगिन न होणे, अशा अनेक तक्रारी नगरसेवकांच्या होत्या. अशा अनेक अडचणीमुळे नगरसेवकांना नागरिकांचे प्रश्न मांडता येत नव्हते. अशीच परिस्थिती इतर समितीच्या सभांची होती. यामुळे प्रत्यक्ष सभा घ्याव्यात, अशी मागणी राजकीय पक्षांची होती.
'या' ठिकाणी होऊ शकतात सभा