महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Apr 19, 2022, 7:18 PM IST

ETV Bharat / city

BMC Disaster Management Plan Stalled: मुंबई महापालिकेचा आपत्ती व्यवस्थापन आराखडा रखडला

मुंबई शहरात आपत्कालीन परिस्थितीला ( Emergency situation in Mumbai city ) तोंड देण्यासाठी महापालिकेने आपत्ती व्यवस्थापन आराखडा करण्याचे ठरवले होते. मात्र अद्यापही हा आराखडा तयार करण्यात आलेला ( BMC Disaster Management Plan Stalled ) नाही. त्यामुळे यंदाच्या पावसाळ्यात मुंबईकरांना जीव मुठीत ठेऊन जगावे लागणार का? असा सवाल उपस्थित होत आहे.

मुंबई महापालिकेचा आपत्ती व्यवस्थापन आराखडा रखडला
मुंबई महापालिकेचा आपत्ती व्यवस्थापन आराखडा रखडला

मुंबई - मुंबईत पूर, इमारत कोसळणे, भूस्खलन, अतिवृष्टी, बॉम्बस्फोट, आग, रेल्वे अपघात आदी घटना ( Emergency situation in Mumbai city ) घडतात. अशा घटना घडल्यावर कोणत्या उपाययोजना कराव्यात यासाठी आपत्ती व्यवस्थापन आराखडा बनवण्याचा निर्णय मुंबई महापालिकेकडून घेण्यात आला आहे. मात्र हा आराखडा अद्याप बनवलाच नसल्याचे समोर आले ( BMC Disaster Management Plan Stalled ) आहे. यामुळे यावर्षीचा पावसाळाही मुंबईकरांना आपला जीव मुठीत घेऊन काढावा लागणार आहे.



मुंबई दुर्घटनांचे शहर -मुंबईत गेल्या वर्षी चेंबूर आणि विक्रोळी येथे भूस्खलन होऊन २९ जणांचा मृत्यू झाला. मुंबईत २९० भूस्खलन क्षेत्र आहेत. २२४ अतिधोकादायक इमारती आहेत. पावसाळ्यात काही तासात जास्त प्रमाणात पाऊस पडल्यास पूर स्थिती निर्माण होते. मुंबई शहर नेहमीच दहशतवाद्यांच्या हिटलिस्टवर राहिले आहे. मुंबईत आगीही मोठ्या प्रमाणात लागतात. अशा घटनांमध्ये नागरिक जखमी होतात. काहींचा मृत्यूही ( Mumbai is the city of accidents ) होतो. अशा घटना घडल्यास त्या परिस्थितीला त्वरित प्रतिसाद देण्यासाठी पालिकेने आपल्या २४ विभाग कार्यालयाच्या हद्दीत आपत्ती व्यवस्थापन कक्षाची स्थापना करण्याचा निर्णय घेतला आहे.



आपत्ती व्यवस्थापन आराखडा -आपत्कालीन व्यवस्थापन कक्षाचा विस्तार करण्यासाठी कृती आराखडा तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार २४ विभाग कार्यालयात पाच जणांची टीम बनवली जाणार आहे. यात आपत्ती व्यवस्थापनाचा अनुभव असलेली एक व्यक्ती, तीन सहाय्यक, स्थानिक अग्निशमन केंद्रातील अधिकारी आणि सुरक्षा कर्मचारी यांचा समावेश आहे. ही पाच जणांची टीम आपल्या विभागात कोणत्या ठिकाणी भूस्खलन होऊ शकते, कोणती इमारत पडू शकते, कोणत्या ठिकाणी पावसाचे पाणी साचू शकते आदी संभाव्य धोके ओळखून त्यांची नोंद करेल. अशा घटना घडल्यावर नागरिकांची सुटका करण्यासाठी, बचाव करण्यासाठी, त्यांचे पुनर्वसन करण्यासाठी कोणत्या जागा वापरता येऊ शकतील, आदींची माहिती असलेला आराखडा बनवला जाणार असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली.


आराखडा रखडला -आपत्ती व्यवस्थापन आराखडा बवण्यासाठी २४ विभाग कार्यालयांना सांगण्यात आले आहे. आपल्या विभागातील माहिती गोळा करण्याचेही आदेश देण्यात आले आहेत. मात्र गेल्या महिनाभरात विभाग कार्यालयांनी अशी कोणातीही माहिती पालिका प्रशासनाला दिलेली नाही, अशी माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. यामुळे पावसाळा जवळ आला तरी अद्याप हा आरखडा तयार होऊ शकलेला नाही. आराखडा बनला नसल्याने एखादी दुर्घटना घडल्यास यावर्षीचा पावसाळाही मुंबईकरांना आपला जीव मुठीत घेऊन काढावा लागणार आहे.


हजारो नागरिकांचा जीव धोक्यात-मुंबईत ४६५ अतिधोकादायक इमारती ( Extremely dangerous buildings In Mumbai ) आहेत. त्यापैकी १३४ इमारती जमीनदोस्त करण्यात आल्या आहेत. ७६ इमारतींचे पाणी आणि वीज कापले आहे. १०७ इमारती रिकाम्या करण्यात आल्या आहेत. ३१ इमारतींची प्रकरणे न्यायालयात असल्याने त्यामधील नागरिकांना इमारातींमधून बाहेर काढणे शक्य नसल्याचे पालिकेतील अधिकाऱ्यांनी सांगितले. मुंबईत सध्या २२४ इमारती आजही धोकादायक म्हणून उभ्या आहेत. यात आजही हजारो नागरिक आपला जीव मुठीत घेऊन राहत आहेत.



हेही वाचा : मुंबईत चार मजली इमारत कोसळली.. ९ जणांना ढिगाऱ्याखालून काढले

ABOUT THE AUTHOR

...view details