मुंबई - मुंबई महापालिकेची निवडणूक जवळ आल्याने मुंबईकरांना खुश करण्यासाठी विकासांच्या कामांचा धडाका सुरु झाला आहे. नुकतेची १७०० कोटींची रस्त्यांच्या कामांना मंजुरी देण्यात आली आहे. त्यानंतर आता पूर्व आणि पश्चिम उपनगरातील जुनी मैदाने आणि उद्यानांचा चेहरा मोहरा बदलला जाणार आहे. पाच उद्याने आणि मैदानांना थीम पार्कचा नवा लूक दिला जाणार आहे. पालिकेने यासाठी निविदा मागवल्या असून त्यावर २५ कोटी ६५ लाख रुपये खर्च केला जाणार आहे.
- उद्यान, मैदाने थीम पार्क होणार!
मागील दोन वर्षापासून कोरोना विरोधात लढा सुरु आहे. कोरोनाच्या प्रतिबंधासाठी मुंबई महापालिकेला मोठा आर्थिक फटका बसला आहे. पालिकेचे आतापर्यंत सुमारे अडीच हजार कोटींहून अधिक खर्च झाले आहेत. पालिकेने त्यामुळे काही विकासकामांना कात्री लावली आहे. यात उद्याने आणि मैदानांचे सुशोभीकरणाच्या कामांचाही समावेश होता. प्रशासनाने पुन्हा मोठ्या प्रमाणात विकासकामे हाती घेतली आहेत. यात मुंबईतील मैदाने, उद्याने, पार्क यावर पालिकेने अधिक लक्ष वेधले आहे. दादर, वरळी, अंधेरी, बोरीवली, भायखळा, सायन, कांदिवली परिसरातील उद्यानांची डागडुजीची कामे सुरु केल्यानंतर आता प्रबोधनकार ठाकरे उद्यान, विक्रोळी पश्चिम, पंकेशा मनोरंजन मैदान, घाटकोपर पश्चिम, राजे शिवाजी मैदान, चारकोप, दहिसर गावठाण या उद्यान आणि मैदाने थीम पार्क म्हणून विकसित होणार आहेत. पालिकेच्या नियोजन विभागाने या कामांचे नियोजन केले आहे. मुंबईतील विविध भागातील उद्याने, मैदाने आणि तसेच परिसरातील पदपथ दुरूस्ती यावर भर देण्यात आला आहे. यासाठी जिल्हा नियोजन समितीने विशेष निधीचीही तरतूद केली असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
- 'या' उद्यानांचे काम केले जाणार
प्रबोधनकार ठाकरे उद्यान, विक्रोळी पश्चिम
थीम : मेडिटेशन पार्क
क्षेत्रफळ : २८,४८७ चौरस मीटर
योगा आणि ध्यानधारणा विभाग
चालण्यासाठी पाथ वे
विविध खेळ साहित्यासह मुलांचा विभाग
हिरवळीसह व्यायामाची साहित्य
शाळेच्या मुलांसाठी खेळाचे मैदान
रॉक क्लायबिंग झोन
- पंकेशा मनोरंजन मैदान, घाटकोपर पश्चिम