मुंबई- गेले दोन वर्षे कोरोनाच्या प्रसारामुळे मुंबई महापालिकेचा महसूल ( revenue of BMC in corona crisis ) घटला आहे. मुंबई पालिकेने थकबाकीदारांना नोटीस पाठविल्या आहेत. २१ दिवसात कर भरा, अन्यथा मालमत्ता जप्त करण्याची कारवाई करण्यात येईल, असा महापालिकेने थकबाकीदारांना इशारा ( BMC warning on property tax ) देण्यात आला आहे.
महसूल घटला असताना आरोग्य तसेच प्रकल्पावर निधी खर्च करावा लागत आहे. महसूल वाढीसाठी पालिकेने मालमत्ता कर वसुलीवर भर दिला आहे.
हेही वाचा-Pegasus Snooping : नैतिकतेच्या आधारे मोदी सरकारने राजीनामा द्यावा; नाना पटोलेंची मागणी
मालमत्ता जप्तीची कारवाई -
मुंबई महापालिकेचा आर्थिक स्त्रोत असलेला जकात कर बंद झाल्याने पालिकेला कोट्यवधी रुपयांच्या महसूलावर पाणी सोडावे लागले आहे. त्यामुळे मालमत्ता कर वसुलीवर पालिकेने भर दिला आहे. जास्तीत जास्त थकबाकी वसूल करण्याचे पालिकेचे ( BMC target of property tax collection ) उदिष्ट्ये आहेत. त्यामुळे महापालिकेने गेल्या वर्षापासून थकबाकीदारांवर कठोर कारवाई सुरुवात केली आहे.
हेही वाचा-Mumbai Corona Update : मुंबईत १,४११ नव्या रुग्णांची नोंद, ११ जणांचा मृत्यू
वर्षभरात ११ हजार ६६१ मालमत्ता जप्त
गेल्या वर्षी तब्बल ११ हजार ६६१ मालमत्ता जप्त करण्यात आल्या आहेत. यात हेलिकॉफ्टरपासून भूखंड, गाळे, तसेच वाहने, संगणक, महागड्या उपकरणांचाही समावेश होता. यंदाही महापालिकेने थकबाकीदारांना १० जानेवारीपासून नोटीस पाठविण्यास सुरुवात केली आहे. या थकबाकीदारांना २१ दिवसांची मुदत देण्यात आली आहे. या मुदतीत थकबाकी न भरल्यास मालमत्ता जप्तीसारखी कारवाई करण्यात येणार आहे.
हेही वाचा-BJP MLA Suspension Quashes : 'लक्षात घ्या, भाजप आमदारांना न्यायालयानं सुनावलं आहे' : नवाब मलिक
मोठे थकबाकीधारक पालिकेच्या निशाण्यावर -
महापालिकेने मुंबईतील मोठ्या थकबाकीदारांची यादीच तयार केली आहे. त्यानुसार प्रत्येक प्रभागातील पहिल्या पाच थकबाकीदारांकडून कराची वसुली करण्यावर भर देण्यात येणार आहे. यातील काही थकबाकीदारांची शेकडो कोटी रुपयांची थकबाकी ( recovery of property tax by BMC ) आहे. या वसुलीसाठी महापालिका आक्रमक भूमिका घेणार आहे. लिलावासाठी न्यायालयीन अडचण नसलेल्या थकबाकीदारांच्या जप्त मालमत्तांचा लिलाव करून कर वसूल करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. त्यासाठी पालिकेने कायद्यातही तरतूद केली आहे.
पालिकेला १ हजार ४३५ कोटी रुपयांच्या वसुलीचे उद्दिष्ट
येत्या काळात लिलावाची प्रक्रियाही सुरू करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. पालिकेने या आर्थिक वर्षात तीन हजार ७०० कोटी रुपयांची मालमत्ता कर वसुली केल्याची माहिती पालिकेच्या संबंधित विभागाच्या अधिकाऱ्याने दिली. पालिकेला या वर्षी मालमत्ता करातून ५ हजार १३५ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळणे अपेक्षित आहे. मार्च अखेरपर्यंत पालिकेला १ हजार ४३५ कोटी रुपयांच्या वसुलीचे उद्दिष्ट आहे.