मुंबई -मुंबईसह महाराष्ट्रात गणेशोत्सव मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. मात्र मागील वर्षीपासून कोरोनाचा प्रसार सुरु झाल्याने या सणावर काही प्रमाणात निर्बंध आले आहेत. गेल्या वर्षीप्रमाणे या वर्षीही हा सण साधेपणाने साजरा करावा, असे आवाहन राज्य सरकार आणि मुंबई महापालिकेने केले आहे. त्यानुसार हा सण कोरोना नियमांचे पालन करून साजरा केला जावा यासाठी पालिकेने आपली तयारी सुरु केली आहे.
मुंबईत गणेशोत्सव
मुंबईमध्ये सुमारे २ लाखाहून अधिक घरगुती मूर्ती बसवल्या जातात. मुंबईमध्ये १० हजार सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे आहेत. मुंबईत दीड, पाच, सात आणि अकरा दिवसाचे गणपती बसवले जातात. यासाठी मुंबई महापालिकेकडून गणेश आगमनापूर्वी रस्त्यावरील खड्डे बुजवणे, गणेश विसर्जनासाठी कृत्रिम तलाव तसेच नैसर्गिक विसर्जनस्थळी सुविधा उपलब्ध करून देणे, गणेश भक्तांना सोयी सुविधा उपलब्ध करून देणे आदी कामे महापालिकेकडून केली जातात. त्यासाठी पालिकेने तयारी सुरु केली आहे.
विसर्जनासाठी १६८ कृत्रिम तलाव
मागील वर्षी मुंबईमध्ये कोरोनाचा प्रसार असल्याने पालिकेने नैसर्गिक विसर्जनस्थळी मूर्ती विसर्जन करण्यास बंदी घालून कृत्रिम तलावात मूर्ती विसर्जन करण्याचे आवाहन केले होते. त्याला मुंबईकरांनी चांगला प्रतिसाद दिला होता. यंदाही मुंबईकरांनी कृत्रिम तलावात मूर्ती विसर्जित करावी, असे आवाहन पालिकेने केले आहे. गर्दी टाळण्यासाठी आणि सोशल डिस्टेसिंगचे नियम पाळता यावेत म्हणून पालिकेने १६८ ठिकाणी कृत्रिम तलाव उपलब्ध करून दिले जाणार असल्याची माहिती पालिकेचे उपायुक्त हर्षद काळे यांनी दिली आहे.
सार्वजनिक मंडळासाठी हे नियम
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाकडून कृत्रिम तलावात मूर्ती विसर्जित करण्याला विरोध होता. यावर पालिका आणि गणेशोत्सव समन्वय समिती यांच्यात बैठक झाली. या बैठकीत मंडळाच्या कार्यकर्त्यांनी मिरवणूक न काढता मंडपात आरती करून १० कार्यकर्त्यांनी मूर्ती विसर्जन स्थळी आणून पालिका कर्मचाऱ्यांच्या ताब्यात द्यावी. ती मूर्ती पालिका कर्मचारी नैसर्गिक स्थळी विसर्जन करतील, असा निर्णय घेण्यात आल्याचे काळे यांनी सांगितले.
२ आणि ४ फुटांची मूर्ती
मागील वर्षीप्रमाणे यंदाही घरगुती मूर्ती २ फुटांची तर सार्वजनिक मंडळाची मूर्ती ४ फुटांची असेल. काही मंडळांनी मूर्ती आणि सजावट यांची उंची चार फुटांच्या वर असावी, अशी मागणी केली होती. मात्र मूर्ती आणि सजावट यांची उंची ४ फुटांच्या वर जाणार नाही या नियमांचे पालन सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी करावे, अशी सूचना काळे यांनी केली आहे.
ऑनलाइन दर्शन