महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

लॉकडाऊन - देहविक्री करणाऱ्या महिला, तृतीयपंथीयांना मुंबई पालिकेकडून अन्नधान्याचे वाटप

मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील देहविक्रय करणाऱ्या महिला व तृतीय पंथीय यांना महिनाभर पुरेल एवढ्या अन्नधान्याचा समावेश असलेल्या रेशन किट वितरणाची सुरुवात नुकतीच करण्यात आली आहे.

अन्नधान्य वाटप
अन्नधान्य वाटप

By

Published : May 5, 2021, 3:03 PM IST

मुंबई - कोरोनाबाधित असलेल्यांची संख्या वाढत असल्याने प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून सध्या लॉकडाऊन लागू आहे. या पार्श्वभूमीवर समाजातील अनेक घटकांना आपल्या दैनंदिन गरजा भागविणे आव्हानात्मक होऊ शकते, ही बाब लक्षात घेऊन महानगरपालिकेच्या नियोजन खात्याद्वारे विविध स्तरीय उपाययोजनांची अंमलबजावणी सातत्याने करण्यात येत आहे. याच उपाययोजनांचा भाग म्हणून बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील देहविक्री करणाऱ्या महिला व तृतीयपंथीय यांना महिनाभर पुरेल एवढ्या अन्नधान्याचा समावेश असलेल्या रेशन किट वितरणाची सुरुवात नुकतीच करण्यात आली आहे.

४ हजार ५०० महिलांना किटचे वाटप -

या उपक्रमाची सुरुवात अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) आश्विनी भिडे, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) संजीव जयस्वाल, स्थानिक नगरसेवक जावेद जुनेजा यांच्या विशेष उपस्थितीत ना. म. जोशी मार्गावरील सावित्रीबाई फुले महानगरपालिका शाळेत नुकतीच करण्यात आली. या उपक्रमातंर्गत विविध स्वयंसेवी संस्थांच्या सहकार्याने व महानगरपालिकेच्या पुढाकाराने सुमारे ४ हजार ५०० इतक्या महिला व तृतीय पंथीयांना विविध दैनंदिन गरजानुरुप अन्नधान्याचा समावेश असलेले किटचा पुरवठा करण्यात येत आहे, अशी माहिती नियोजन विभागाच्या सहाय्यक आयुक्त डॉ. संगीता हसनाळे यांनी या निमित्ताने दिली आहे.

काय आहे किटमध्ये -

बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील विविध परिसरांमध्ये सुमारे ४ हजार ५०० इतक्या संख्येने देहविक्रय करणाऱ्या महिला व तृतीय पंथीयांचे वास्तव्य आहे. सध्याच्या लॉकडाऊनच्या काळात या महिला व तृतीयपंथीयांना विविध अडचणींना सामोरे जावे लागत असल्याने महानगरपालिकेच्या नियोजन विभागाने पुढाकार घेऊन विविध स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने अन्नधान्य किट वितरणाचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. या किटमध्ये तांदूळ, कणिक, साखर, चहा, मीठ, तिखट, हळद, गरम मसाला, मसुरीची डाळ, चणे, कांदे, बटाटे, खाद्यतेल, अंगाचा साबण व कपडे धुण्याचा साबण इत्यादी बाबींचा समावेश आहे. गेल्यावर्षी देखील लॉकडाऊनच्या काळात याच पद्धतीने अन्नधान्य किटचे वितरण करण्यात आले होते, अशीही माहिती महानगरपालिकेच्या नियोजन खात्याद्वारे देण्यात आली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details