महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Mumbai Municipal Budget 2022 : मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प आज सादर होणार - मुंबई महानगरपालिका बजेट 2022 23

मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प ( Mumbai Municipal Corporation Budget 2022 ) आज (गुरुवारी ३ फेब्रुवारीला) सादर केला जाणार आहे. मागील वर्षी ३९ हजार कोटींचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला होता. आज सादर होणारा सन २०२२ - २३ चा अर्थसंकल्प ( Budget for the Year 2022-23 ) सुमारे ४१ हजार कोटींच्या ( Rs 41 Crore Budget ) दरम्यान असेल.

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

By

Published : Feb 3, 2022, 5:18 AM IST

मुंबई - मुंबई महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक ( Mumbai Municipal Corporation General Election ) होत आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प ( Mumbai Municipal Corporation Budget 2022 ) आज (गुरुवारी ३ फेब्रुवारीला) सादर केला जाणार आहे. मागील वर्षी ३९ हजार कोटींचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला होता. आज सादर होणारा सन २०२२ - २३ चा अर्थसंकल्प ( Budget for the Year 2022-23 ) सुमारे ४१ हजार कोटींच्या ( Rs 41 Crore Budget ) दरम्यान असेल. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अर्थसंकल्प ऑनलाइन पद्धतीने सादर केला जाणार असून मुंबई महापालिकेच्या फेसबुक आणि युट्युबवर तो लाईव्ह पाहता येणार आहे.

  • सर्वात मोठा अर्थसंकल्प सादर होणार

मुंबईमध्ये गेले दोन वर्षे कोरोना विषाणूचा प्रसार आहे. या प्रसारादरम्यान कोरोनाच्या तीन लाटा आल्या आहेत. कोरोनाच्या दोन लाटा थोपवण्यात पालिकेला यश आले आहे. तर तिसरी लाट आटोक्यात आली आहे. कोरोनाचा सामना करताना सर्वात श्रीमंत अशी महापालिका म्हणून ओळख असलेल्या मुंबई महापालिकेने २०२१ - २२ चा ३९ हजार ०३८ कोटींचा मेगा बजेट सादर केला होता. यामधील डिसेंबर २०२१ पर्यंत ४६ टक्के रक्कम खर्च करण्यात महापालिकेला यश आले आहे. मागील अर्थसंकल्पातील निधी खर्च झाला नसला तरी महापालिकेची निवडणूक असल्याने मुंबईकरांसाठी नव्या घोषणा केल्या जाण्याची शक्यता आहे. यामुळे अर्थसंकल्पात वाढ होऊन तो सुमारे ४१ हजार कोटींच्या दरम्यान असेल अशी माहिती मिळत आहे.

  • ४६ टक्के रक्कम खर्च

मुंबई महानगरपालिकेच्या सन २०२० - २१ मध्ये भांडवली खर्चामधील केवळ ४५ टक्के रक्कम खर्च झाली होती. सन २०२१-२२ च्या अर्थसंकल्पात भांडवली खर्चासाठी १८७५०.९९ कोटींची तरतूद करण्यात आली होती. पण यातील ८७५६.४६ कोटी रुपयेच म्हणजे ४६.७० टक्के खर्च ३१ डिसेंबर २०२१ पर्यंत खर्च झाले आहेत. ३१ डिसेंबरपर्यंत
मुंबई मलनिस्सारण प्रकल्पासाठी १३३९ कोटीची तरतूद करण्यात आली त्यापैकी एकही रुपया खर्च करण्यात आलेला नाही. कोस्टल रोडसाठी २ हजार कोटींपैकी १९९८ कोटी, गोरेगाव मुलुंड लिंक रोडसाठी १३०० कोटींपैकी २९.६८ कोटी, विकास नियोजन विभागासाठी २२५१ कोटींपैकी ९८.२६ कोटी, रस्ते वाहतुकीवर १३६७ कोटीपैकी १३५० कोटी, पाणी पुरवठ्यासाठी १२३२ कोटीपैकी ५०८.४९ कोटी, आरोग्यासाठी १२१० कोटीपैकी ५४३.७५ कोटी, पर्जन्य जल वाहिन्यासाठी ९८५ कोटीपैकी ७५५ कोटी, मलनिस्सारण वाहिन्यांसाठी १०६० कोटीपैकी ४१३ कोटी, पूल विभागासाठी ८३० कोटीपैकी ६१२ कोटी, घन कचरा विभागासाठी ७५८ कोटीपैकी २१७ कोटी, पालिकेच्या मालमत्ता दुरुस्तीसाठी ६६७ कोटी पैकी ४०५ कोटी, शाळांच्या दुरुस्तीसाठी २४४ कोटीपैकी १६८ कोटी, इतर ३९९४ कोटींपैकी १६५७ कोटी रुपये खर्च करण्यात आला आहे. मार्च महिन्यापर्यंत हा खर्च ६० टक्क्यांपर्यंत गेला तरी ४० टक्क्यांची तरतूद शिल्लक राहणार आहे.

  • असा वाढला अर्थसंकल्प

मुंबई महापालिकेने २०१९-२० साठी ३०,६९२ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर केला होता. सन २०२०-२१ मध्ये त्यात वाढ होऊन ३३,४४१ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर केला होता. २०१९ - २० पेक्षा २०२० -२१ च्या अर्थसंकल्पात ८.९५ टक्क्यांची वाढ झाली होती. २०२०-२०२१ चा ३३ हजार ४४१ कोटींचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला होता. गेल्या वर्षी २०२१-२२ च्या अर्थसंकल्पात नव्या प्रकल्पांसह मोठ्या विकास योजनांसाठी १६.७४ टक्क्यांची वाढ होऊन ३९ हजार ०३८ कोटींचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला होता.

हेही वााचा -तर प्रभाग रचनेच्या विरोधात कोर्टात जाऊ - भाजपचा इशारा

ABOUT THE AUTHOR

...view details