महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

मुंबई पालिकेचा अर्थसंकल्प सादर; मुंबईकरांवर कोणताही कराचा बोजा नाही

By

Published : Feb 3, 2021, 12:44 PM IST

Updated : Feb 3, 2021, 10:20 PM IST

अर्थसंकल्प
अर्थसंकल्पमुंबई महापालिका अर्थसंकल्प LIVE

17:24 February 03

मुंबईकरांवर कोणताही कर लावलेला नाही

  • सेवा देण्यासाठी कर वाढवण्याचा विचार
  • मालमत्ता कर वाढू नये म्हणून सरकारकडून अध्यादेश काढण्याची गरज आहे
  • त्यासाठी आम्ही प्रयत्न केलेले नाहीत

17:05 February 03

मुंबई पालिका अर्थसंकल्पातील ठळक मुद्दे

  • डबेवाला भवन उभारणार असून,  डबेवाल्याचा सन्मान करणार
  • भूखंडांच्या बदल्यात 5234 कोटी राज्य सरकारकडून पालिकेला येणे आहे. त्याचा पाठपुरावा सुरू आहे. लवकरच हा निधी प्राप्त होईल
  • झोपडपट्टीच्या जागेवर पुनर्विकास करताना एसआरएमधून पालिकेला 1600 कोटी येणे आहे. ते लवकर ट्रान्सफर केले जातील

16:47 February 03

मुंबई पालिका आयुक्तांच्या पत्रकार परिषदेतील ठळक मुद्दे

  • 175 कोटी खर्च करून गिरगाव चौपाटी येथील बिर्ला क्रीडा भवन (मराठी कला दालन) नव्याने उभारणार, राज्य सरकारकडून निधी घेणार
  • वरळी डेअरी येथे ऍक्वेरियम 500 कोटी रुपये खर्च करून उभारणार
  • पी नॉर्थ, एल, एच इस्ट वॉर्ड हे मोठे वॉर्ड आहेत. त्याचे विभाजन केले जाणार. पी नॉर्थ ऐवजी पी वेस्ट आणि पी इस्ट हे दोन वॉर्ड होतील. एल वॉर्डबाबतही असा निर्णय घेण्याचे विचाराधीन
  • 3331 ट्रक उभे राहतील अशी पार्किंग व्यवस्था उभारली जाणार आहे.

बेस्ट उपक्रम  

  • 3649 निवृत्त कर्मचाऱ्यांना ग्रॅच्युटी देता आलेली नाही. त्यासाठी 406 कोटी देणे आहे. बेस्टसाठी सल्लागार नेमला जाणार असून, तो आर्थिक स्थिती आणि इतर बाबतीत सल्ले देईल

16:34 February 03

पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांच्या पत्रकार परिषदेतील महत्वाचे मुद्दे

  1. 2021- 22 मध्ये 12 हॉस्पिटल आणि 12 पुलांचे काम करणार
  2. 31 डिसेंबर 2021 पर्यंत 20 हजार 301 शौचालयांचे काम पूर्ण करणार
  3. 149 फुटपाथ, 128 ट्राफिक जंक्शन, 42 पुलांखालील जागांचे सुशोभीकरण केले जाणार
  4. प्रत्येक वॉर्डमधील 5 उद्यानांचे सुशोभीकरण केले जाणार
  5. मुंबईत अनेक प्राधिकरण आहेत. मुंबईच्या विकासासाठी एकच प्राधिकरण करण्याची गरज आहे. शासनाला पत्र दिले आहे.
  6. पालिकेला एकमेव प्राधिकरण घोषित करावे
  7. कफ परेड, मरिन ड्राईव्हचे प्लानिंग अॅथोरिटी घोषित करा, सरकारकडे मागणी केली आहे

16:05 February 03

पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांची पत्रकार परिषद सुरू

मुंबई -18750 कोटी विविध प्रकल्पांवर खर्च करणार असल्याची माहिती मुंबई पालिका आयुक्तांनी दिली आहे. कोस्टल रोड, एसटीपी प्रकल्प, हायड्रॉ सोलर पॉवर, वैतरणा धरण, रेल्वेवर 12 पूल, 6 इतर पूल, 5 रुग्णालयांचे नुतनीकरण यावर हा खर्च करणार असल्याचे पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी सांगितले. 

15:26 February 03

अर्थसंकल्पातील इतर विशेष तरतुदी -

  1. अर्थसंकल्पातील इतर विशेष तरतुदी -
  2. रस्त्यांसाठी - १६०० कोटी
  3. गोरेगाव मुलुंड जोड रस्ता - ३०० कोटी
  4. पुलांसाठी - ७९९.६५ कोटी
  5. प्रजन्य जल वाहिन्या, नद्यांचे पुनर्जीवन - ९१२.१० कोटी
  6. सागरी किनारा प्रकल्प (कोस्टल रोड) - २००० कोटी
  7. मुंबई अग्निशमन दल - १०४.४४ कोटी
  8. मुलुंड डम्पिंग बंद करणे / अंबरनाथ येथे जमीन खरेदीसाठी - २३१.९७ कोटी
  9. उद्यान आणि हरित क्षेत्र - २५४.१८ कोटी
  10. पशु वैद्यकीय आरोग्य - ३९.९६
  11. गलिच्छ वस्ती सुधारणा - ३२६ कोटी
  12. महिला व वयोवृद्धांसाठी - ५१.९६ कोटी
  13. आपत्कालीन व्यवस्थापन - १० कोटी
  14. पर्यटन, वारसावस्तू आणि किल्ले संवर्धनासाठी - ३०६.६६ कोटी
  15. समुद्र किनाऱ्यांचे सुशोभीकरण - ४ कोटी
  16. पालिका रुग्णालयातून कार्बन डायऑकसाईड कमी करण्यासाठी - ५ कोटी
  17. पाणी पुरवठा - १७२८.८५ कोटी
  18. मलनिस्सारण प्रकल्प - ४०२.५५ कोटी
  19. बेस्ट उपक्रमाला अर्थसहाय्य - १५०० कोटी
  20. अग्निशमन दल - १३५.१६ कोटी
  21. प्राथमिक शाळांच्या दुरुस्त्या - ४०३.४६ कोटी
  22. विकास नियोजन विभागासाठी - ७७४ कोटी
  23. आगीच्या धोक्यापासून मुक्त मुंबई - ५०३.५१ कोटी
  24. मलनिस्सारण सुधारणा कार्यक्रम - ३२०.१६ कोटी
  25. कचऱ्याचे व्यवस्थापन - २३१.९७ कोटी
  26. माहिती तंत्रज्ञान - १५७.९८ कोटी
  27. लायसन्स विभागासाठी - २२१.०२ कोटी
  28. पुरातत्व आणि नैसर्गिक वारसा - १८३.०३ कोटी
  29. इमारत परिरक्षण खाते - ३७० कोटी
  30. पशुवैद्यकीय खाते व देवनार पशुवध गृह - ३६ कोटी

15:17 February 03

विशेष तरतुदी -

  1. रस्ते वाहतूक, सागरी किनारा प्रकल्प - ६५११.७० कोटी
  2. घन कचरा व्यवस्थापन - ४०५०.३० कोटी
  3. आरोग्य - ४७२८.५३ कोटी
  4. पर्जन्य जलवाहिन्या - १६९९.१३ कोटी
  5. प्राथमिक शिक्षण - २९४५.७८ कोटी

14:57 February 03

कोविड दरम्यान मृत कर्मचाऱ्यांच्या वारसांना ५० लाख

मुंबई - पालिकेच्या अर्थसंक्लपात कोविड दरम्यान मृत कर्मचाऱ्यांच्या वारसांना ५० लाख रुपये देण्याचे जाहीर करण्यात आले आहे.  

14:52 February 03

बेस्टसाठी ७५० कोटींची तरतूद

मुंबई - मुंबई पालिकेच्या अर्थसंक्लपात बेस्टसाठी 750 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. तसेच बेस्टला ४०६ कोटींचे कर्ज देणार असल्याचेही जाहीर करण्यात आले आहे.  

13:23 February 03

सन २०२०- २१ या वर्षाचे भांडवली कामाचे अर्थसंकल्पीय अंदाज ३०१.३३ कोटी असून तो सुधारित करून १७९.०३ कोटी एवढा अपेक्षीला आहे. तर सन २०२१-२२ या वर्षासाठी भांडवली कामाचे अर्थसंकल्पीय अंदाज २४४.०१ कोटी इतका आहे.

13:23 February 03

सन २०२० -२१ या अर्थसंकल्पीय वर्षाचे महसुली उत्पन्न व खर्चाचे अर्थसंकल्पीय अंदाज २ हजार ५४१.१३ कोटी एवढे आहे. तर आगामी वर्षाकरीता म्हणजेच २०२१- २२ साठी महसुली उत्पन्न व खर्चाचे अर्थसंकल्पीय अंदाज २ हजार ७०१.७७ कोटी इतके अंदाजित आहे.

२०२१ - २२ चा शिक्षण विभागाचा अर्थसंकल्प हा २०२० - २१ या आर्थिक वर्षापेक्षा १.१९ कोटींनी जास्त आहे.  

२०१९ - २० या आर्थिक वर्षात शिक्षण विभागाचा अर्थसंकल्प २ हजार ७३३.७७ कोटींचा तर २०१८ - १९ या आर्थिक वर्षात शिक्षण विभागाचा अर्थसंकल्प २ हजार ५६९ कोटी रुपये इतका होता.    

12:42 February 03

शिक्षण विभासाठी २ हजार ९४५ कोटींची तरतूद

मुंबई महापालिकेच्या शिक्षण विभागाचा २०२१ - २२ या आर्थिक वर्षासाठीचा २ हजार ९४५.७८ कोटींचा अर्थसंकल्प सहआयुक्त रमेश पवार यांनी शिक्षण समिती अध्यक्ष संध्या दोषी यांना सादर केला. 

12:39 February 03

सहआयुक्त रमेश पवारांनी पाण्याऐवजी पिले सॅनिटायझर

मुंबई महापालिकेच्या शिक्षण विभागाचा अर्थसंकल्प सादर करणारे सहआयुक्त रमेश पवार पाण्याऐवजी सॅनिटाईझर प्यायल्याने अर्थसंकल्प सादर करताना उशीर झाला. 

08:24 February 03

शिक्षण विभागाचा अर्थसंकल्प सादर करण्यास सुरूवात

मुंबई - देशाची आर्थिक राजधानी व जागतिक दर्जाचे शहर असलेल्या मुंबई शहराच्या महापालिकेचा अर्थसंकल्प आज सादर होत आहे. हा अर्थसंकल्प पालिका आयुक्तांना स्थायी समितीत सादर करावा लागतो.

Last Updated : Feb 3, 2021, 10:20 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details