महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Iqbal Singh Chahal : मुंबई पालिका आयुक्त चहल यांची दिल्लीत सचिव पदावर होणार नियुक्ती

मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त व प्रशासक इक्बाल सिंग चहल यांची केंद्रीय सचिव पदावर निवड करण्यात आली ( Iqbal chahal Been Appointed Secretary Central Government ) आहे.

Iqbal Singh Chahal
मुंबई पालिका आयुक्त चहल

By

Published : May 28, 2022, 6:58 PM IST

Updated : May 28, 2022, 9:43 PM IST

मुंबई - मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त व प्रशासक इक्बाल सिंग चहल यांची केंद्रीय सचिव पदावर निवड करण्यात आली आहे. केंद्रात सचिव पदाच्या जागा रिक्त झाल्यावर त्या ठिकाणी नियुक्ती केली जाणार आहे. याबाबतची माहिती स्वत: चहल यांनी दिली ( Iqbal chahal Been Appointed Secretary Central Government ) आहे.

'हा सर्वात महत्वाचा टप्पा' - केंद्र सरकारच्या अपॉइंटमेंट कमिटीने जेष्ठ आय ए एस अधिकाऱ्यांची यादी जाहीर केली आहे. या यादीमधील अधिकाऱ्यांची केंद्र सरकारच्या सचिव पदावर नियुक्ती केली जाणार आहे. त्यात इक्बाल सिंग चहल यांचा समावेश आहे. त्यानंतर इक्बाल सिंग चहल यांनी म्हटले की, 'मला हे सांगण्यास आनंद होत आहे की भारत सरकारने मला भारत सरकारच्या सचिव पदावर नियुक्त केले आहे. आयएएस अधिकाऱ्याच्या कारकिर्दीतील हा सर्वात महत्त्वाचा टप्पा आहे,' असे चहल यांनी म्हटले आहे.

चहल यांच्या कामाची दखल - जगामध्ये हाहाकार पसरवणारा कोरोना मुंबईत मार्च २०२० मध्ये पसरला. त्यावेळी मुंबईत मे २०२० मध्ये इक्बाल सिंग चहल यांची पालिका आयुक्त पदावर नियुक्ती करण्यात आली होती. चहल यांनी मुंबई मॉडेल, धारावी मॉडेल, चेस द व्हायरस, डॉक्टर आपल्या दारी, टेस्टिंग टेस्टिंग ट्रॅकिंग ट्रीटमेंट आदी संकल्पना राबवून कोरोनाचा प्रसार रोखला आहे. याची दखल जागतिक पातळीवर घेण्यात आली आहे.

हेही वाचा -Aryan Khan Drug case : आर्यन खानला क्लीनचिट मिळाल्याने समीर वानखेडेंच्या अडचणी वाढणार

Last Updated : May 28, 2022, 9:43 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details