मुंबई- सात रस्त्याकडे जाणाऱ्या मोनो रेलमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे मोनोची वाहतूक विस्कळीत झाली होती. या घटनेमुळे लोअर परळ ते मिंट कॉलनी दरम्यान मोनो रेल्वे उभी असल्याने प्रवासी सुद्धा अडकून पडले होते. नंतर मोनोला टोईंग करून लोअर परळला आणण्यात आले. त्यानंतर प्रवाशांना उतरविण्यात आल्याची माहिती मिळत आहे.
Mumbai Mono Rail : तांत्रिक बिघाडामुळे 'मोना'डार्लिंग अडकली; प्रवाशांची सुटका - मुंबई मोनो रेल्वेत तांत्रिक बिघाड
सात रस्त्याकडे जाणाऱ्या मोनो रेलमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे मोनोची वाहतूक विस्कळीत झाली होती. या घटनेमुळे लोअर परळ ते मिंट कॉलनी दरम्यान मोनो रेल्वे उभी असल्याने प्रवासी सुद्धा अडकून पडले होते. नंतर मोनोला टोईंग करून लोअर परळला आणण्यात आले. त्यानंतर प्रवाशांना उतरविण्यात आल्याची माहिती मिळत आहे.
अभियांत्रिकी पथक घटनास्थळी दाखल -
आज दुपारी ४ वाजून ३० मिनिटांच्या सुमारास सात रस्ताकडे जाणारी एका मोनो रेलमध्ये तांत्रिक बिघाड झालेला होता. यामुळे ही मोनो लोअर परळ ते मिंट कॉलनी दरम्यान अडकली होती. या मोनो रेलमध्ये मोठ्या प्रमाण प्रवासी होते. या घटनेची माहिती मिळताच मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे अभियांत्रिकी पथक घटनास्थळी दाखल झाले होते. ही मोनो रेल ओढून आणण्यासाठी दुसरी मोनोरेल पाठविण्यात आली होती. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. काही कालवधीतच मोनोला टोईंग करून लोअर परळला आणली. त्यानंतर प्रवाशाना उतरविण्यात आले.