मीरा भाईंदर - मेट्रो कर्मचाऱ्यांची दादागिरी सुरूच असल्याचे समोर आले आहे. या अगोदर देखील या कर्मचाऱ्यांकडून सामान्य नागरिकांशी वाद झाल्याचं दिसून आले आहे. रविवारी मध्यरात्री सिल्व्हर पार्क परिसरात एका तरुणांशी वाद झाला. चक्क त्या तरुणांच्या अंगावर क्रेन चढवण्याचा प्रयत्न मेट्रो कर्मचाऱ्यांनी केला. त्यामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी आणि युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी काम बंद congress worker action against Metro line 9 worker in Mira Bhayander पाडलं.
मीरा भाईंदरमध्ये मेट्रो ९ चे काम सध्या प्रगतीपथावर सुरू आहे. या मेट्रोच्या कामांमुळे अनेक गोष्टींचा नाहक त्रास सामान्य नागरिकांना सहन करावा लागत आहे. सायंकाळी होणारी वाहतूक कोंडी, काम सुरू असल्याने रस्त्यावर साचलेले चिखल खड्डे, मध्यरात्री एकतर्फी रस्ता, अनेक ठिकाणी रस्त्यावर साहित्य असल्याने रेडियम लावण्यात आले नाही. त्यामुळे वाहन चालवताना अपघात होता आहेत. अश्या अनेक गोष्टींच्या त्रासाने नागरिक हैराण झाले आहेत. त्यातच मागील अनेक दिवसांत मेट्रो कर्मचाऱ्याच्या तक्रारी मध्ये वाढ झाली आहे. वीस दिवसांपूर्वी एका पत्रकारावर मेट्रो कर्मचाऱ्यांनी भ्याड हल्ला केला, त्यामध्ये ते गंभीर जखमी झाले होते. तर, पत्रकारावर हल्ल्याची घटना ताजी असतानाच रविवारी रात्री एक तरुण कामावरून घरी जात असताना मेट्रोचे क्रेन रस्ता अडवून जात असल्याने विचारपूस केली. तेव्हा त्या तरुणाच्या अंगावर क्रेन चढवण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
या प्रकरणाची माहिती युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सिद्धेश राणे यांना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच कर्तव्यावर असलेल्या सुपरवायझर यांना विचारपूस केली असता उडवाउडवीची उत्तर देण्यात आली. संबंधित क्रेन चालक फरार झाला आहे. क्रेन चालकांला बोलावं अशी मागणी युवक काँग्रेसकडून करण्यात आली. मात्र, क्रेन चालकांचा पत्ता न लागल्याने काँग्रेस कार्यकर्त्यांनी मेट्रोचे काम बंद पाडले.
युवक काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष सिद्धेश राणे यांनी मेट्रो अधिकाऱ्यांची भेट घेण्यासाठी कनकिया परिसरातील कार्यालयात गेले. तेव्हा मेट्रोच्या सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांनी पळ काढला. यावेळी मिरारोड पोलीस ठाण्यातील कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. आम्हाला उद्या पोलिसांनी मिरारोड पोलीस ठाण्यात बोलवले आहे. मेट्रो अधिकाऱ्यांची उद्या भेट घेणार असून, कायदेशीर कारवाईची मागणी करणार आहोत, कारवाई न झाल्यास युवक काँग्रेस तीव्र आंदोलन करेल, अशी माहिती सिद्धेश राणे यांनी दिली.