महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Mumbai Mega Block : मुंबईत आज मध्य व हार्बर रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक; प्रवाशांचे होणार हाल

उपनगरीय रेल्वे मार्गावर रेल्वे रुळांची दुरुस्ती आणि तांत्रिक कामांसाठी मध्य रेल्वे मार्गावर ३१ ऑगस्ट २०२१ रोजी अर्थात आज मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेच्या माटुंगा ते मुलुंड अप आणि डाउन धीम्या मार्गावर आणि हार्बर मार्गावरील चुनाभट्टी/वांद्रे- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस अप आणि डाऊन हार्बर मार्गावर मेगाब्लॉक असणार आहे. मेगा ब्लॉकमधून पश्चिम रेल्वे मार्गावरील प्रवाशांना दिलासा देण्यात आला आहे.

Mumbai Mega Block
Mumbai Mega Block

By

Published : Oct 31, 2021, 4:00 AM IST

मुंबई - उपनगरीय रेल्वे मार्गावर रेल्वे रुळांची दुरुस्ती आणि तांत्रिक कामांसाठी मध्य रेल्वे मार्गावर ३१ ऑगस्ट २०२१ रोजी अर्थात आज मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेच्या माटुंगा ते मुलुंड अप आणि डाउन धीम्या मार्गावर आणि हार्बर मार्गावरील चुनाभट्टी/वांद्रे- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस अप आणि डाऊन हार्बर मार्गावर मेगाब्लॉक असणार आहे. तर पश्चिम रेल्वे मार्गावर आज कोणताही मेगाब्लॉक नसणार आहे.

मध्य रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक -

मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावरील माटुंगा ते मुलुंड अप आणि डाउन धिम्या मार्गावर सकाळी ११.०० ते सायंकाळी ४.०० वाजेपर्यंत मेगाब्लॉक असणार आहे. या मेगाब्लॉक दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी १०.१८ ते दुपारी ३.३६ पर्यंत सुटणाऱ्या धीम्या मार्गावरील सेवा माटुंगा आणि मुलुंड स्थानकांदरम्यान डाऊन जलद मार्गावर वळवण्यात येईल आणि या सेवा विद्याविहार, कांजूरमार्ग व नाहूर स्थानकावर थांबणार नाहीत. पुढे मुलुंड येथे पुन्हा धिम्या मार्गावर वळवण्यात येईल.

हे ही वाचा -यास्मिन वानखेडे यांनी मंत्री नवाब मलिक यांच्या विरोधात पोलीस ठाण्यात केली तक्रार


या स्थानकावर लोकल थांबणार नाही -

ठाणे येथून सकाळी १०.३७ ते दुपारी ३.५५ वाजेपर्यंत अप-धीम्या मार्गावरील सेवा मुलुंड ते माटुंगा दरम्यान अप जलद मार्गावर वळवण्यात येईल आणि या सेवा नाहूर, कांजूरमार्ग व विद्याविहार स्थानकावर थांबणार नाहीत. पुढे माटुंगा स्थानकावर पुन्हा अप धीम्या मार्गावर वळवण्यात येईल.

हार्बर मार्गावर मेगाब्लॉक -

मध्य रेल्वेच्या हार्बर मार्गावरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-चुनाभट्टी / वांद्रे अप-डाउन हार्बर मार्गावर सकाळी ११.४० ते सायंकाळी ४.४० पर्यंत मेगाब्लॉक असणार आहे. या ब्लॉकदरम्यान सीएसएमटी/वडाळा रोड येथून सकाळी ११.३४ ते सायंकाळी ४.४७ वाजेपर्यंत वाशी/बेलापूर/पनवेल करीता सुटणारी डाउन हार्बर मार्गावरील सेवा आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून वांद्रे/गोरेगावकडे जाणारी डाउन हार्बर मार्गावरील सेवा सकाळी ९.५६ ते दुपारी ४.४३ वाजेपर्यंत रद्द राहतील. पनवेल/बेलापूर/वाशी येथून सीएसएमटीकरीता सकाळी ९.५३ ते दुपारी ३.२० पर्यंत सुटणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा आणि गोरेगाव/वांद्रे येथून सकाळी १०.४५ ते दुपारी ४.५८ पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनससाठी सुटणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा बंद राहतील. तथापि, ब्लॉक कालावधीत पनवेल अणि कुर्ला (प्लॅटफॉर्म क्रमांक ८) दरम्यान विशेष सेवा चालवल्या जातील.

ABOUT THE AUTHOR

...view details