मुंबई- उपनगरीय रेल्वे मार्गावर रेल्वे रुळांची दुरुस्ती आणि तांत्रिक कामासाठी ( Western Railway repair and technical work ) मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वे मार्गावर रविवारी १२ जून २०२२ रोजी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहेत. मध्य रेल्वेच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते विद्याविहार अप आणि डाऊन धीम्या मार्गावर तर हार्बर मार्गावर सीएसएमटी -चुनाभट्टी / वांद्रे अप आणि डाउन हार्बर मार्गावर ( railway Megablocks on Sunday ) येणार आहे.
मध्य रेल्वेवर मेगाब्लॉक -मध्य रेल्वेच्या ( Megablock on Central Railway ) सीएसएमटी- विद्याविहार अप आणि डाउन धीम्या मार्गावर रविवारी सकाळी १०.५५ ते दुपारी ३.५५ पर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. या ब्लॉक कालावधीत सीएसएमटी येथून सकाळी १०.४८ ते दुपारी ३.४९ पर्यंत सुटणाऱ्या धीम्या रेल्वेगाड्या सीएसएमटी ते विद्याविहार स्थानकांदरम्यान डाउन जलद मार्गावर वळवल्या जातील. या ट्रेन भायखळा, परळ, दादर, माटुंगा, शीव आणि कुर्ला स्थानकांवर थांबतील आणि पुढे धिम्या डाउन मार्गावर वळवल्या जातील. याशिवाय घाटकोपर येथून सकाळी १०.४१ ते दुपारी ३.५२ पर्यंत सुटणाऱ्या अप धिम्या सेवा विद्याविहार ते सीएसएमटी दरम्यान अप जलद मार्गावर वळवण्यात येतील. कुर्ला, शीव, माटुंगा, दादर, परळ आणि भायखळा स्थानकात थांबतील.