महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

नागपाडा दुर्घटना : इमारत मालक तसेच स्टे मिळवून देणाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा - महापौर - सुल्तानी मिश्रा इमारत

मिश्रा इमारतीला ६ वर्षांपूर्वी दुरुस्तीसाठी परवानगी दिली होती. मात्र, इमारत नव्याने बांधण्यात आलेली नाही. यामुळे अशा दुर्घटना घडत असल्याने इमारतीचे मालक, बिल्डर आणि न्यायालयाची दिशाभूल करून स्टे मिळवून देणारे सर्वच दोषी आहेत. अशा सर्वांवर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करावा असे निर्देश महापौर पेडणेकर यांनी संबंधित प्रशासनाला दिले.

mumbai-mayor-ordered-to-file-a-charge-of-culpable-homicide-against-the-building-owner-of-sultani-mishra-building
इमारत मालक तसेच स्टे मिळवून देणाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा - महापौर

By

Published : Aug 28, 2020, 6:58 AM IST

मुंबई - नागपाडा येथील सुलतानी-मिश्रा या इमारतीचा काही भाग कोसळून दोन जणांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेला इमारत मालक आणि या इमारतीला न्यायालयातून स्टे मिळवून देणारे जबाबदार असल्याने त्यांच्यावर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करा, असे निर्देश मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी संबंधित यंत्रणांना दिले.

महाडमध्ये इमारत कोसळल्याची घटना ताजी असताना आज मुंबईतील नागपाड्यातील सुलतानी-मिश्रा या इमारतीचा काही भाग दुपारी एकच्या सुमारास कोसळला. ही इमारत म्हाडाची सेस इमारत होती. इमारत नव्याने बांधण्यासाठी एनओसी दिली असतानाही ही इमारत खाली करून पाडण्यात आली नव्हती. इमारत धोकादायक झाल्याने त्याचा काही भाग कोसळून दोन जणांचा मृत्यू झाला. आलिया रियासत कुरैशी (वय १२) आणि नूर कुरैशी (वय ७०) अशी मृतकांची नावे आहेत. या इमारत दुर्घटना स्थळाला महापौर किशोरी पेडणेकर यांनी आमदार अमीन पटेल आणि म्हाडाचे अध्यक्ष विनोद घोसाळकर यांच्या उपस्थितीत भेट दिली.

इमारत मालक तसेच स्टे मिळवून देणाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा - महापौर
यावेळी इमारत मालक एनओसी मिळाल्यानंतरही नवी इमारत बांधत नाहीत. धोकादायक असलेल्या सुमारे पाचशे इमारती मुंबईत उभ्या आहेत. ज्याचे मालक बिल्डर बनून एनओसी घेतात. मात्र, नवी इमारत बांधत नाहीत. एनओसी रद्द करायची नोटीस दिली की त्या विरोधात कोर्टात जाऊन स्टे मिळवतात. मिश्रा इमारतीला ६ वर्षांपूर्वी दुरुस्तीसाठी परवानगी दिली होती. मात्र, इमारत नव्याने बांधण्यात आलेली नाही. यामुळे अशा दुर्घटना घडत असल्याने इमारतीचे मालक, बिल्डर आणि न्यायालयाची दिशाभूल करून स्टे मिळवून देणारे सर्वच दोषी आहेत. अशा सर्वांवर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करावा असे निर्देश महापौर पेडणेकर यांनी संबंधित प्रशासनाला दिले.

ABOUT THE AUTHOR

...view details