मुंबई -महानगरात नेहमीच पावसाळ्यात सखल भागात पाणी साचल्याने मुंबईची तुंबई झाल्याचा आरोप होतो. समुद्राला भरती असताना मुसळधार पाऊस पडल्यास मुंबईच्या भौगोलीक परिस्थितीमुळे सखल भागात पाणी साचते. मात्र महापालिकेने ब्रिमस्टोव्हेड प्रकल्प उभारले आहेत. पर्जन्य जल वाहिन्यांची पाणी वाहून नेण्याची क्षमता वाढवल्याने पाण्याचा निचरा पहिल्यापेक्षा लवकर होतो, असा दावा महापौर किशोरी पेडणेकर यांनी केला. त्याचवेळी मुंबईत पाणी साचणार नाही, असा दावा कधी केला नाही आणि कोणीही करू नये,असेही महापौरांनी म्हटले.
समुद्राच्या भरती वेळी पाऊस पडल्यास पाणी साचणारच - महापौर पेडणेकर
मुंबईमधील दादर हिंदमाता, परेल, किंग सर्कल, सायन, नॅशनल कॉलेज वांद्रे, वडाळा, चेंबूर, भायखळा आदी सखल भागात पाणी साचते. सखल भागात पाणी साचल्याने नालेसफाई योग्य प्रकारे केली नसल्याची पालिकेवर टीका होते. पाणी साचल्याने रस्ते वाहतूक ठप्प होत असल्याने मुंबईकरांना त्रास सहन करावा लागतो. मुंबईत नाले सफाई योग्य प्रकारे केल्याने पाणी साचणार नाही, असे दावे पालिका प्रशासन नेहमीच करत असते. मात्र, पावसात पालिकेचे हे सर्व दावे फोल ठरत असतात.
मुंबईत पावसाला सुरुवात होताच साचणारे पाणी आणि रस्त्यावरील खड्डे हे चर्चेचे विषय असतात. काही तास पाऊस पडला तरी मुंबईमधील दादर हिंदमाता, परेल, किंग सर्कल, सायन, नॅशनल कॉलेज वांद्रे, वडाळा, चेंबूर, भायखळा आदी सखल भागात पाणी साचते. सखल भागात पाणी साचल्याने नालेसफाई योग्य प्रकारे केली नसल्याची पालिकेवर टीका होते. पाणी साचल्याने रस्ते वाहतूक ठप्प होत असल्याने मुंबईकरांना त्रास सहन करावा लागतो. मुंबईत नाले सफाई योग्य प्रकारे केल्याने पाणी साचणार नाही, असे दावे पालिका प्रशासन नेहमीच करत असते. मात्र, पावसात पालिकेचे हे सर्व दावे फोल ठरत असतात. यावर्षीही मुंबईत पावसाला सुरुवात झाल्यापासून दरवेळी सखल भागात पाणी साचत आहे. यामुळे पालिकेला यावर्षीही टीकेला सामोरे जावे लागत आहे.
याबाबत बोलताना महापौर किशोरी पेडणेकर म्हणाल्या, की मुंबईत कधीही पाणी तुंबणार नाही असा दावा कधीही कोणी केलेला नाही आणि करूही नये. महापालिकेने ब्रिमस्टोव्हेड प्रकल्पामधून अनेक ठिकाणी पंपिंग स्टेशन उभी केली आहेत. पाणी साचते त्या ठिकाणी पंप बसवण्यात आले आहेत. पालिकेचे कर्मचारी दिवसभर पावसात रस्त्यावर उभे राहून पाण्याचा निचरा करण्यासाठी काम करत आहेत, असे महापौरांनी सांगितले. समुद्राला भरती असताना मोठा पाऊस आला की पाणी साचण्याची समस्या मुंबईत निर्माण होते. गेल्या 5 ते 6 वर्षात एका तासात पडणाऱ्या पावसाचे प्रमाण वाढले आहे. मुंबई शहर हे सात बेटांनी बनले आहे. समुद्राला भरती असताना मुसळधार पाऊस आला तर शहरातील पाणी समुद्रात सोडता येत नाही. काही वर्षांपूर्वी शहरात सखल भागात पाणी साचले तर ते दोन ते दिवस साचून राहत होते. आता समुद्रातील भरती गेल्यावर दोन ते तीन तासात पाण्याच्या निचरा होत आहे, असे महापौरांनी सांगितले. मुंबईला वाचवण्यासाठी जे प्रकल्प आवशक्य आहेत ते केले जात आहे. ब्रिटानिया पंपिंग स्टेशन जवळ टनेलिंगचे काम 30 टक्के बाकी आहे. ते काम पूर्ण झालं तर आता जितके पाणी साचते तितके साचणार नाही.