मुंबई - मालाड येथील मैदानाला नाव टिपू सुलतानचे ( Tipu Sultan name Controversy ) नाव पालिकेने दिलेले नाही, अशी प्रतिक्रिया मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर ( Kishori Pednekar Statement On Tipu Sultan name Controversy ) यांनी दिली आहे. तसेच ही जागा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अधिकारात येत असून जे नाव पालिकेने दिले नाही, त्यावरून वाद कशाला, असही त्या म्हणाल्या. त्याच बरोबर हा मुंबईला अस्थिर आणि अशांत करण्याचा प्रयत्न असून पालिका आणि राज्य सरकारची विकास कामे बघून विरोधकांना पोटशूळ उठला असल्याची टीकाही त्यांनी केली.
महापौर पेडणेकर यांची प्रतिक्रिया ‘तेंव्हा भाजपाने विरोध का केला नाही’-
मुंबईत दोन रस्त्यांना टिपू सुलतानचे नाव देण्यात आले. त्यावेळी स्थापत्य समितीच्या अध्यक्ष पदावर भाजपाचे विठ्ठल खरटमोल व कृष्णा उर्फ महेश पारकर हे होते. स्थापत्य समितीनंतर या नावाला सभागृहात मंजुरी देण्यात आली. त्यावेळी सूचक विठ्ठल खरटमोल हे होते, तर अनुमोदक अमित साटम होते. त्यावेळी भाजपाने विरोध का केला नाही. असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.
काय आहे वाद -
मुंबई उपनगरातील मालाड हा विभाग मुंबईचे पालकमंत्री तसेच काँग्रेस नेते अस्लम शेख यांचा मतदारसंघ आहे. या विभागात असलेल्या उद्यानाला टिपू सुलतान यांचे नाव देण्यावरून सध्या वातावरण तापले असताना शिवसेना व भाजपचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. अशाप्रसंगी जर पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी असे सांगितले आहे की अशा पद्धतीचा प्रस्तावाच महापालिकेकडे आला नाही, मग हे नाव कशा पद्धतीने व कोणी दिलं? हा प्रश्न आता उपस्थित झालेला आहे. तर दुसरीकडे भाजप नेते या सर्व प्रश्नांसाठी शिवसेनेला जबाबदार धरत आहेत.
भाजपाची सोयीची दुटप्पी भूमिका -
मुंबईच्या एम/पूर्व वॉर्डातील रस्त्याला शहीद टिपू सुलतान मार्ग नाव देण्याच्या भाजपा नगरसेवकाच्या प्रस्तावाच्या समर्थनासाठी दुथडी भरून भाजपाचे नगरसेवक उपस्थित होते. भाजपासाठी 2013 चे टिपू वेगळे, 2022 ला वेगळे! फरक हाच की तेव्हा निवडणूक नव्हती आणि आता आहे. या दुटप्पीपणाला काय म्हणावे?, असा सवाल सावंत यांनी केला. भाजपा नेते व कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बी एस येडीयुरप्पा शहीद टिपू सुलतानच्या कबरीवर गेले. तेव्हा तेथील अभ्यागत वहीमध्ये जे टिपू सुलतान बद्दल मत मांडले होते. आताची बदललेली संधीसाधू भूमिका ही सत्तेसाठी असून हा भाजपाच्या निर्लज्जतेचा कळस निश्चितच म्हणता येईल, अशी टीका सचिन सावंत यांनी केली.
हेही वाचा -Sanjay Raut Attack on BJP : ...तर भाजपने सर्वात आधी राष्ट्रपतींचा राजीनामा घ्यावा - संजय राऊतांचा भाजपावर हल्लाबोल