मुंबई -केंद्रीय मंत्री नारायण राणे ( Minister Narayan Rane ) यांनी दिशा सालियन मृत्यू प्रकरणात खळबळजनक खुलासा केला आहे. दिशाचा बलात्कार करुन हत्या केल्याचे राणे यांनी म्हटलं आहे. यावर आता मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी उत्तर दिले ( Mumbai Mayor Kishori Pednekar ) आहे. महिलेच्या मृत्यूनंतरही तिचे चारित्र्यहनन केले जात आहे. याबाबत महिला आयोगाकडे कठोर कारवाई करण्याची मागणी करणार असल्याचे किशोरी पेडणेकर यांनी सांगितले ( Kishori Pednekar On Narayan Rane ) आहे.
किशोरी पेडणेकर म्हणाल्या की, नारायण राणे यांनी दिशा सालियनचा मुद्दा उपस्थित केला आहे. एक स्त्री म्हणून मी व्यथित आहे. एका केंद्रीय मंत्र्याने शवविच्छेदन अहवालाबाबत बोलणे चुकीचे आहे. महिलेच्या मृत्यूनंतरही तिचे चारित्र्यहनन केले जात आहे. यासंदर्भात महिला आयोगाकडे कठोर कारवाई करण्याची मागणी करणार आहे. भाजपाच्या महिला (चिवा) यांनाही सांगेन महिला म्हणून लक्ष घाला. मृत्यूनंतर ही बदनामी करणं महाराष्ट्राला शोभणार नाही, असेही पेडणेकर यांनी म्हटलं आहे.