मुंबई - मुंबईमधील सॅण्डहर्स्ट रोड येथील बोरी मोहल्ला परिसराला चोर बाजार म्हणून ओळख आहे. या ठिकाणी खासगी विकासकाने रहदारीचे रस्ते बंद केले आहेत. याचा त्रास वर्षभर येथील व्यापाऱ्यांना सहन करावा लागत आहे. या व्यापाऱ्यांसाठी आधीच्या सरकारने काहीच केले नाही. मात्र आमचे सरकार या व्यापाऱ्यांचा प्रश्न नक्की सोडवेल, असे महापौर किशोरी पेडणेकर यांनी सांगितले आहे.
मुंबईमधील सॅण्डहर्स्ट रोड येथील बोरी मोहल्ला चोर बाजारमधील व्यापाऱ्यांनी आज महापौर बंगल्यावर आंदोलन केले, या आंदोलनानंतर महापौर बोलत होत्या. मी वर्षभरापूर्वी महापौर झाल्यावर हे व्यापारी माझ्याकडे आले होते. इमारतमालक आणि भाडेकरी यांच्यात वाद आहे. विकासकाने रस्ते बंद केल्याने व्यापाऱ्यांना वळसा मारून ये-जा करावी लागते. गेले वर्षभर ते तो त्रास सहन करत आहेत. रस्ता पालिकेचा असल्याने अधिकाऱ्यांनी त्याकडे लक्ष देणे गरजेचे होते. त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केल्याने पालिका आयुक्तांना या प्रकरणी लक्ष घालण्यास सांगणार आहे. हे व्यापारी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनाही भेटले आहेत. या व्यापाऱ्यांचे पुनर्वसन करण्याचे काम राज्य सरकारचे आहे. आधीच्या सरकारने लक्ष दिले नाही. मात्र आमचे सरकार नक्की लक्ष देऊन हा प्रश्न सोडवेल, असे महापौरांनी म्हटले आहे. लवकरच या विभागाला भेट देणार असल्याचेही महापौरांनी सांगितले.
आंदोलन का?