मुंबई - जगभरात थैमान घातलेल्या कोरोना व्हायरस मुंबईपर्यंत येऊन पोहोचला आहे. या व्हायरसमुळे जगभरात हजारो लोकांचा बळी गेला असून याला रोखायचे असले तर नागरिकांनी घरी राहणे गरजेचे आहे. तसे आवाहन केले तरी अनेक तरुण रस्त्यावर फिरत आहेत. यापैकी अनेकांवर पोलिसांनी कारवाई केली आहे. अशा तरुणांनी घरात राहून आपल्या कुटूंबाची काळजी घ्यावी, असे आवाहन मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी गुढीपाडवा सणाच्या निमित्ताने मुंबईकरांना आज (बुधवारी) केले.
'तरुणांनो, घरात राहून आपल्यासह कुटुंबाची काळजी घ्या'
आजपासून देशभरात लॉकडाऊन केले आहे. तरीही लोक विशेष करुन तरुण घराबाहेर रस्त्यावर दिसत आहेत. या तरुणांनी घराबाहेर पडू नये. घरात राहून नागरिकांनी आपली स्वतः ची व आपल्या कुटुंबाची काळजी घ्यावी, हे संकट दूर होईल यासाठी सर्वांनी सामाजिक जाणिव ठेऊन सूचनांचे पालन करावे.
यावेळी त्या म्हणाल्या, की पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोनाचा सामना करण्यासाठी घराबाहेर पडू नका, असे आवाहन केले आहे. राज्यात जमावबंदीनंतर संचारबंदी लावण्यात आला आहे. आजपासून देशभरात लॉकडाऊन केले आहे. तरीही लोक विशेष करुन तरुण घराबाहेर रस्त्यावर दिसत आहेत. या तरुणांनी घराबाहेर पडू नये. घरात राहून नागरिकांनी आपली स्वतः ची व आपल्या कुटुंबाची काळजी घ्यावी, हे संकट दूर होईल यासाठी सर्वानी सामाजिक जाणिव ठेऊन सूचनांचे पालन करावे.