मुंबईचे पेंग्विन विरुद्ध अहमदाबादचे पेंग्विन राजकीय सामना रंगणार.. महापौर पेडणेकर अहमदाबादच्या दौऱ्यावर - undefined
21:10 January 29
पेेग्विनवरुन राजकारण तापणार
मुंबई - मुंबईतील राणीच्या बागेत आणलेल्या पेनग्विनबाबत भाजपकडून जोरदार आरोप झाले. त्यानंतर मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर अहमदाबादमध्ये गेल्यात. अहमदाबादमध्ये आणलेल्या पेनग्विनची पाहणी करण्यासाठी महापौर गेल्या आहेत. गुजरातमधील पेनग्विन प्रकल्प, त्याचा खर्च किती, याचा आढावा महापौरांनी घेतला. आता भाजपच्या आरोपाला त्या चोख उत्तर देणार असल्याची चर्चा आहे.
मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी स्वत: अहमदाबादेतील सायन्स सेंटरच्या पेनग्विन कक्षाला भेट देऊन अनेक महत्वाचे मुद्दे समोर आणलेत. राणीबागेतील पेनग्विन पहाण्याचा तिकीटदर २५ ते ५० रुपये तर अहमदाबादेतील पेनग्विन पाहण्याकरता ३०० रुपये मोजावे लागतात. त्यामुळे आता राणीबागेचे पेनग्विन आणि अहमदाबादेचे पेनग्विन अशी तुलना सुरू झाली आहे. मुंबईत पेनग्विन प्रकल्पाचा खर्च हा 17 कोटी आला होता तर अहमदाबाद मध्ये 257 कोटी खर्च केला गेलाय. याबाबत महापौर लवकरच खुलासा करणार आहेत.
गुजरातमध्येही पेंग्विनला इंग्रजी नावे -
मुंबईच्या राणीबागेत पेनग्विनच्या पिलाला ऑस्कर हे नाव दिल्याने भाजपाने मराठी नाव का नाही असा प्रश्न करत शिवसेनेला लक्ष्य केले होते. गुजरातच्या अहमादाबाद येथील पेनग्विन पार्कमध्ये ५ अफ्रिकन पेनग्विन आहेत. त्यांची नावं सिमोन, पुंबा, नेमो, मुशू आणि स्वेन अशी आहेत. इंग्रजी नावावरून शिवसेनेला लक्ष्य करणाऱ्या भाजपच्या राज्यातही पेनग्विनला इंग्रजीत नावे दिली आहेत. यामुळे पेंग्विनच्या खर्चासह नावावरूनही भाजपला चोख उत्तर दिले जाणार आहे.