महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

ही तर हिंदुत्वाच्या नावाने स्टंटबाजी, पेडणेकरांची मनसेच्या बॅनरबाजीवर टीका

मनसेने केलेली बॅनरबाजी ही हिंदुत्वाच्या नावाने केलेली राजकीय स्टंटबाजी आहे. हिंदुत्वाच्या नावाने राजकीय स्टंटबाजी करायची याला काही अर्थ नाही, अशा शब्दात मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी टीका केली आहे. तसेच भाजपाच्या चित्रा वाघ या काहीही बोलतात, यामुळे त्यांच्यावर बोलणे टाळले पाहिजे, असे महापौरांनी म्हटले आहे.

किशोरी पेडणेकर
किशोरी पेडणेकर

By

Published : Oct 15, 2021, 3:24 PM IST

मुंबई -मुंबईत शिवसेनाभवनसमोर मनसेने "गर्व से कहो हम हिंदू है" असे पोस्टर लावले आहे. या पोस्टरवरून कधीतरी उठून हिंदुत्व जागवायचे नाही, ते जगायचे असत. मनसेने केलेली बॅनरबाजी ही हिंदुत्वाच्या नावाने केलेली राजकीय स्टंटबाजी आहे. हिंदुत्वाच्या नावाने राजकीय स्टंटबाजी करायची याला काही अर्थ नाही, अशा शब्दात मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी टीका केली आहे. तसेच भाजपाच्या चित्रा वाघ या काहीही बोलतात, यामुळे त्यांच्यावर बोलणे टाळले पाहिजे, असे महापौरांनी म्हटले आहे.

हेही वाचा -आता भाजपच्या स्टंटबाज ताई कुठे गेल्या?; महापौर पेडणेकरांचा सवाल

'हिंदुत्वाच्या नावाने राजकीय स्टंटबाजी'

मुंबईत शिवसेनाभवन समोर असलेल्या पेट्रोल पंपाजवळ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने 'गर्व से कहो हम हिंदू है, असे बॅनर लावले आहे. मनसेने असे पोस्टर लावून राज्यात व मुंबई महापालिकेत सत्ताधारी असलेल्या शिवसेनेला खुले आव्हान दिले आहे. याआधीही शिवसेनेने हिंदुत्व सोडल्याची टीका वेळोवेळी मनसेने केली आहे. या बॅनरबाबत शिवसेनेच्यावतीने प्रतिक्रिया देताना महापौर बोलत होत्या. यावेळी बोलताना, बाळासाहेब आणि प्रबोधनकारांनी ज्वलंत हिंदुत्व काय असत ते आम्हाला शिकवले आहे. ते हिंदुत्व आम्ही सोडलेल नाही. कधीतरी जाग येऊन उठायचे, कधीतरी उठून हिंदुत्व जागवायचे नाही, ते जगायचे असते. हिंदुत्व हे कवच कुंडल आहे, ते रस्त्यावर आणायची गरज नाही. हिंदुत्वाच्या नावाने राजकीय स्टंटबाजी करायची याला अर्थ नाही, अशी टीका महापौरांनी केली आहे.

'निवडणुकीसाठी शिवसेना सज्ज'

मुंबई महापालिकेची निवडणूक काही महिन्यावर आली आहे. याबाबत बोलताना आम्ही कायम म्हणत आलोय निवडणुकीच्या वेळेला चॅलेंजेस येतात. पण महाराष्ट्र आणि मुंबईचा माणूस हुशार आहे. शिवसेना हा ज्वलंत पक्ष आहे. शिवसेना हा केवळ बोलणारा पक्ष नाही, काम करणारा पक्ष आहे. शिवसैनिक कन्फ्युज कधीच नसतो. मातोश्रीच्या आदेश आमच्यासाठी उच्च असतात, आदेश येईल त्याचे पालन केले जाईल, शिवसेना तयार आहे, आम्ही तत्पर आहोत, असे महापौरांनी सांगितले.

हेही वाचा -महापौरांच्या कामाची घेतली "वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड लंडन"ने दखल

'ज्वलंत विचारांचा सोने लुटणार'

जळी स्थळी जसे मोगलांना दिसायचे तसे आघाडीचे काम त्यांना खुपत असेल, तर याला आम्ही काही करू शकत नाहीत. आज दसरा आहे, आज शिवसेनेचा कार्यक्रम होणार. शिवाजी पार्कवर लाखोंच्या संख्येने नागरिक यायचे, पण कोविडमुळे षण्मुखानंद सभागृहात कमी क्षमतेत मेळावा घेत आहे. नियम पळून कार्यक्रम करत आहोत. बऱ्याच वेळेला विरोधक मुख्यमंत्र्यांवर हीन टीका करतात, पण सुसंस्कृत नेतृत्व असलेल्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शांत राहून कामाने उत्तर दिली आहेत. मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात आघाडी सरकारने कोविडची दुसरी लाट थोपवलीय. फारसे टीका न करता, समाचार किती घेतील ते ठाऊक नाही, पण सैनिकांमध्ये ऊर्जा भरण्याचे काम ते करतील. पक्षप्रमुख म्हणून ते सुसंस्कृत आहेत. या मेळाव्याच्या माध्यमातून एक वर्षाची ऊर्जा घेऊन आम्ही शिवसैनिक काम करतो असतो. ज्वलंत विचारांचे सोने आज आम्ही लुटणार आहोत, असे महापौर म्हणाल्या.

'चित्रा वाघ काहीही बोलतात'

भाजपाच्या नेत्या चित्रा वाघ यांच्याकडून अनेक नेत्यांवर आणि शिवसेनेवर टीका केली जाते. याबाबत विचारले असता चित्रा वाघ यांच्यावर बोलणार नाही, त्या एकदा एका बाजुने तर नंतर दुसऱ्या बाजूने बोलतात, त्यामुळे त्यांच्यावर बोलणे टाळले पाहिजे, असे महापौर म्हणाल्या.

ABOUT THE AUTHOR

...view details