महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

मुंबईतील तरुणाने गर्लफ्रेंडसोबत व्हिडिओ कॉल लावून स्वतःला पेटवून घेतले - प्रेयसीसोबत व्हिडिओ कॉल

सांताक्रूझ येथे एका तरुणाने प्रेयसीसोबत व्हिडिओ कॉल करत असताना स्वतःला पेटवून घेतले. पोलिसांनी मंगळवारी ही माहिती दिली. पीडित सागर परशुराम जाधव ३० टक्के भाजला आहे. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

व्हिडिओ कॉल लावून स्वतःला पेटवून घेतले
व्हिडिओ कॉल लावून स्वतःला पेटवून घेतले

By

Published : Sep 6, 2022, 7:05 PM IST

मुंबई - येथील उपनगरातील सांताक्रूझ येथे एका १९ वर्षीय तरुणाने प्रेयसीसोबत व्हिडिओ कॉल (video call with girlfriend) करत असताना स्वतःला पेटवून घेतले (Mumbai Man sets himself ablaze). पोलिसांनी मंगळवारी ही माहिती दिली. पीडित सागर परशुराम जाधव हा ३० टक्के भाजला आहे. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत, असे वाकोला पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्याने सांगितले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्री उशिरा एका गणपती मंडपात भेट दिल्यानंतर एका विशिष्ट रस्त्याने जाण्यावरून सागरचा त्याच्या मैत्रिणीशी फोनवरून वाद झाला. रागाच्या भरात त्या व्यक्तीने स्वत:ला पेटवून घेण्याची धमकी दिली. त्याचवेळी त्याने लगेच स्वतःला पेटवून घेतले. सागरने सुती शर्ट घातला होता. त्यामुळे त्याला लगेच आग लागली, असे अधिकाऱ्याने सांगितले.

सागर जाधव याच्या घरी असलेल्या कुटुंबीयांनी आग विझवण्यासाठी धाव घेतली. त्याला रुग्णालयात नेले. पोलिसांनी त्याचा जबाब नोंदवला. त्यामध्ये त्याने म्हटले आहे की त्याच्या टोकाच्या पाऊलासाठी कोणालाही जबाबदार धरले जाऊ नये. याबाबत पुढील तपास सुरू आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details