ठाणे - मध्य रेल्वेवर ( Mumbai Central Railway ) ठाणे ते दिवा स्थानकांदरम्यान पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेच्या कामासाठी 72 तासांचा जम्बोब्लॉक ( Mumbai locals 72-hr mega block ) घेतला जात आहे. शनिवार, रविवार आणि सोमवार असे तीन दिवस हा जम्बोब्लॉक आहे. मध्यरात्री 12 वाजल्यानंतर कामाला सुरुवात झालेली आहे. आता थेट सोमवारी रात्री बारा वाजता नव्या मार्गिकेचं काम पूर्ण होईल. या मेगाब्लॉकच्या कालावधीत जवळपास 350 लोकल धावणार नाहीत. त्याशिवाय शंभरपेक्षा अधिक लांब पल्ल्याच्या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.
मध्य रेल्वेने पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन केले असताना पर्यायी व्यवस्था उचित प्रमाणात नसल्यामुळे चाकरमान्यांचे तीनही दिवस हाल होणार आहेत. आज कळवा स्थानकादरम्यान कोणतीही लोकल थांबत नसल्यामुळे प्रवाशी रेल्वे ट्रेकवरून ठाणे रेल्वे स्थानकाच्यादिशेने चालत जाताना पाहायला मिळाले. एकंदरीत प्रवाशी वर्गाचे कुठेतरी हाल होताना दिसले.