मुंबई -मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने लॉकडाउन लावण्यात आला. त्यानंतर सर्वच सण साधेपणाने साजरे करण्यात आले. मुंबईत कोरोना संसर्गाचा धोका अद्यापही टळलेला नाही. काही दिवसांवर नाताळ सण आला असून, नवीन वर्षाची धामधूम सुरू होईल. आता मुंबईकरांसाठी एक खुशखबर समोर आली आहे. सर्वसामान्यांसाठी बंद असलेला लोकल प्रवास जानेवारीमध्ये सुरू होणार आहे. मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी याबाबत आज घोषणा केली. मार्च महिन्यात फोफोवलेल्या कोरोनाच्या संसर्गामुळे ठप्प पडलेली मुंबईची 'लाईफलाईन' लोकलसेवा बंद करण्यात आली होती.
हेही वाचा -दिल्लीच्या मैदानात बसवण्यात येणार अरुण जेटलींचा पुतळा
यापूर्वी २ ऑक्टोबर रोजी कोविडमुळे आवश्यक सेवा देणाऱ्या कर्मचार्यांसाठीच चालवल्या जाणाऱ्या लोकलमध्ये प्रवासासाठी २३ नोव्हेंबरपर्यंत वकिलांना परवानगी दिली होती. मुंबई शहरातील कोरोना रुग्णांची संख्या वाढल्यामुळे प्रत्येकाला लोकलमध्ये प्रवास करण्याची परवानगी नव्हती.