मुंबई- उपनगरीय रेल्वे मार्गावर रेल्वे रुळांची दुरुस्ती आणि तांत्रिक कामासाठी मध्य रेल्वेच्या हार्बर मार्गावर आणि पश्चिम रेल्वे मार्गावर शनिवारी- रविवारी मेगाब्लॉक घेण्यात येणार ( Mumbai local railways megablock ) आहेत. पश्चिम रेल्वेचा वसई रोड ते भायंदर स्थानकादरम्यान अप जलद मार्गावर आणि हार्बर मार्गावरील छत्रपति शिवाजी महाराज टर्मिनस - चूनाभट्टी आणि बांद्रा डाउन हार्बर मार्गवर मेगाब्लॉक घेण्यात ( local railway megablcok in Mumbai ) आलेला आहे.
हार्बर मार्गावर मेगाब्लॉक -
मध्य रेल्वेचा हार्बर मार्गावरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - चुनाभट्टी आणि बांद्रा डाउन हार्बर मार्गावर ( CTS to Bandra down harbor local ) सकाळी 11.40 ते संध्याकाळी 4.40 पर्यंत मेगाब्लॉक घेण्यात आलेला आहे. तर चुनाभट्टी व बांद्रा - छत्रपति शिवाजी महाराज टर्मिनस अप हार्बर मार्गावर सकाळी 11.10 ते संध्याकाळी 4.10 पर्यंत मेगाब्लॉक घेण्यात आलेला आहे. या ब्लॉक दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई/ वडाळा रोडवरून वाशी/बेलापुर/पनवेलसाठी सुटणाऱ्या लोकल सेवा रद्द असणार आहे. याशिवाय छत्रपति शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईवरून सकाळी 10.48 ते सायंकाळी 4.43 वाजेपर्यत बांद्रा/गोरेगांवसाठी सुटणाऱ्या सर्व डाउन हार्बर मार्गवरील लोकल सेवा रद्द ( megablock railway routes in Mumbai ) असणार आहे. या ब्लॉक कालावधीत प्रवाशांची गैरसोय होणार नाही याकरिता पनवेल आणि कुर्लावरून (प्लेटफॉर्म नंबर 8) विशेष लोकल चालविण्यात येणार आहे.
हेही वाचा-Pune Metro Starts Soon : पुणेकरांच्या सेवेत लवकरच धावणार मेट्रो, जलदगतीने काम सुरु