मुंबईअमरावतीहून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला येणारी अमरावती एक्सप्रेस Amravati Express in Mumbai ही सीएसएमटी स्थानकातून प्रवाशांना उतरवून साईडला गाडी लावताना उशीर झाला. मात्र अमरावती एक्सप्रेस एमटी रेक खाली करण्यासाठी काहीसा उशीर झाला. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस कडे येणाऱ्या आणि सीएसएमटी कसारा कर्जत या दिशेने जाणाऱ्या लोकलला Mumbai Local update अडथळा निर्माण झाला.
नोकरदार, चाकरमाने कामावर जाण्यासाठी म्हणून सकाळीच लवकर निघतात. मात्र करीरोड, मज्जिद बंदर या रेल्वे स्थानकांवर आणि रेल्वे स्थानकाच्या पुढे आणि मागे देखील मध्य रेल्वेच्या वाहतुकीला अडथळा झाला.तब्बल 30 मिनिटे मध्ये रेल्वे लोकल एकाच जागी उभ्या राहिल्या. त्यामुळे रेल्वे प्रवाशांचा संताप झालाय.
लोकल पुन्हा आपापल्या मार्गावर नियमितपणे सुरूप्रवाशांच्या या गैरसोयीला रेल्वे जनसंपर्क अधिकारी एके सिंग यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे. अमरावती मुंबई एक्सप्रेस एमटी रेख आता पूर्णपणे साईडला लागलेला आहे. त्यामुळे लोकल पुन्हा आपापल्या मार्गावर नियमितपणे सुरू झाल्याचे ई टीव्ही भारतला त्यांनी सांगितले.