मुंबई मुंबईतील प्रसिद्ध लालबागच्या राजाच्या चरणी भाविकांनी अर्पण केलेल्या सोन्या - चांदीच्या वस्तूंचा लिलाव आता सुरु झाला आहे. लालबागच्या राजाच्या दानपेटीत दहा दिवसात पाच कोटींचे दान जमा झाले असून एका भाविकाने हिरो होंडाची बाईक देखील दान केली आहे. लालबागच्या राजाच्या चरणी भाविकांनी अर्पण केलेल्या सोन्या चांदीच्या वस्तूंचा लिलावास सुरुवात झाली असून हा लिलाव रात्री १० वाजेपर्यंत सुरु असणार आहे. अनेक भाविक या लिलावास हजेरी लावतात आणि बोली लावून वस्तू विकत घेतात.
लालबागच्या राजा विषयी देशात आणि राज्यात एक वेगळे वैशिष्ट्य आहे. हजारो भाविक मोलाच्या लाख मोलाच्या किमतीचे दागिने जडजबाईर आणि मुर्त्या भेट देतात. आणि त्याच दागिन्यांचा आज लालबाग राजाच्या गणपतीच्या स्थळी लिलाव सुरू आहे आणि या लिलावामध्ये जवळजवळ 60 किलो चांदी आणि पाच किलो सोनं शिवाय पाच कोटीपेक्षा अधिक रोकड रक्कम या दानामध्ये प्राप्त झालेली आहे.नवसाला पावणारा गणपती अशी ख्याती असल्याने लालबागचा राजाला दरवर्षी मौल्यवान वस्तू अर्पण केल्या जातात. यंदाही लालबागचा राजाच्या चरणी अनेक वस्तू अर्पण झाल्या असून त्याच्या लिलावाला सुरुवात झाली आहे.