मुंबईयंदाचा गणेशोत्सव 31 ऑगस्ट 2022 पासून सुरू होत आहे. भाद्रपदाच्या शुक्ल पक्षाच्या चतुर्थी तिथीला गणपती बाप्पाची स्थापना केली जाते. गणेश चतुर्थीचा सण गणेश जन्मोत्सव म्हणून साजरा केला जातो. या दरम्यान लोक मोठ्या थाटामाटात ढोल ताशांच्या गजरात बाप्पाला घरात आणतात. Mumbai Lalbagh Ganesha गणेशोत्सवाच्या दिवसांमध्ये बाप्पाचे नाव सर्वत्र ऐकू येते. अशात सर्वांची नजर लागलेली असते, ती मुंबईतील लालबाग परिसराकडे कारण, गणपती आणि लालबाग या परिसराच अतूट नातं आहे. त्यामुळे आता बाप्पाचं आगमन तोंडावर असताना या भागातील बाजारपेठा सुद्धा बाप्पाच्या आगमनासाठी सजल्या आहेत. नेमकी कशी आहे इथली परिस्थिती पाहुया.
बाजारपेठ बहरलीयाच भागात पारेख ब्रदर्स नावाने एक फार जुने दुकान आहे. या दुकानाचे सर्वेसर्वा योगेश पारेख यांच्याशी संपर्क साधला व त्यांच्या दुकानाला भेट दिली आणि त्यांच्याकडून एकूणच सध्याच्या परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी बोलताना योगेश पारेख म्हणाले की, कोरोनामुळे आपली 2 वर्ष लॉकडाऊन मध्ये गेली. तेव्हा तर सर्वच बंद होतं. सण, उत्सव काही साजरे करता आले नाहीत. पण, आता सर्व निर्बंध हटवल्यामुळे पुन्हा एकदा आपल्या उत्सवाला सुरुवात झाली आहे. Mumbai Lalbagh Ganesha 2022 आणि, त्याचा परिणाम देखील या बाजारपेठ्यांवर दिसून येतोय. दहीहंडीनंतर आता गणपतीसाठी सजावटीचे सामान घेण्यासाठी आमच्याकडे मुंबईतल्या कानाकोपऱ्यातून ग्राहक येत आहेत. सध्या सजावटीसाठी लागणाऱ्या कापडाला प्रचंड मागणी आहे. गणपतीसाठी लागणारे पडदे आणि झालर याच्या अनेक व्हरायटी सध्या आमच्याकडे आहेत. त्यामुळे लोक देखील बरीच गर्दी करत आहेत.