मुंबई - मुंबईत डिसेंबरपासून कोरोना रुग्णांची संख्या वाढत ( Mumbai Corona Cases Increased ) होती. तीन दिवस रोज 20 हजारांवर रुग्णांची नोंद झाली. त्यात आता दिलासादायक माहिती समोर आली आहे. मुंबईतील रुग्णसंख्येत घट होत ( Mumbai Corona Cases Recover ) आहे. गेल्या 15 दिवसांत 1 लाख 34 हजार 671 रुग्ण बरे झाले आहेत.
मुंबईत 10 हजार 661 रुग्णांची नोंद -
मुंबईत डिसेंबर महिन्यापासून रुग्णसंख्या वाढत असल्याने तिसरी लाट आल्याची शक्यता ( Corona Third Wave Mumbai ) वर्तवण्यात आली होती. जानेवारी सुरु झाल्यानंतर तीन दिवस सलग 20 हजारांच्यावर रुग्णसंख्या आढळल्याने चिंता वाढली. मात्र, आता कोरोनाचा प्रसार कमी होत असून, बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत आहे. आज मुंबईत 10 हजार 661 रुग्णांची नोंद झाली तर, 21 हजार 474 रुग्ण कोरोना मुक्त झाले. 1 जानेवारी ते 15 जानेवारी दरम्यान 1 लाख 34 हजार 671 रुग्ण बरे झाले आहेत.
2 टक्के रुग्णांना आयसीयुची गरज