मुंबई -मुंबईतील विलेपार्ले परिसरात 2019 मध्ये रात्रीच्या वेळी कर्तव्यावर असलेले पोलीस अधिकाऱ्यांनी गाडी थांबवायला सांगितली असता गाडी न थांबता पुढे निघून गेले पोलिसांनी पाठलाग केला असता गाडी थांबल्यानंतर गाडीतील व्यक्तीने दारूच्या नशेत पोलीस अधिकाऱ्यांना शिवीगाळ केली होती. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. हा गुन्हा रद्द करण्यात यावा यासाठी मुंबई उच्च न्यायालयात ( Mumbai High Court ) धाव घेण्यात आली होती. मात्र, न्यायालयाने त्या व्यक्तीची याचिका शुक्रवारी (दि. 25 मार्च) फेटाळून लावली आहे. तसेच रात्रीच्या वेळी पोलिसांना चौकशी करण्याचा अधिकार असल्याचे मतही न्यायालयाने व्यक्त केले आहे.
न्यायालयाने म्हटले आहे की, एफआयआर आणि साक्षीदारांच्या जबाबावरून प्राणघातक हल्ला व गुन्हेगारी शक्ती हे प्रथमदर्शनी उघड झाले आहे. याचिकाकर्ता वेगळ्या कारमध्ये बसला होता आणि पहिल्या कारमधील महिलांसोबत सीटची देवाण घेवाण केली होती की नाही हे या टप्प्यावर महत्त्वाचे नाही. हे लक्षात घेणे महत्वाचे आहे की हे घडल्यानंतर पोलिसांवर शिवीगाळ आणि मारहाण झाली, असे न्यायालयाने यावेळी निरीक्षण नोंदवले आहे.
रात्रीच्या वेळी बाहेर पडलेल्या लोकांची चौकशी करण्याचा पोलिसांना पूर्ण अधिकार आहे, असे मुंबई उच्च न्यायालयाने म्हटले आहे. कथितपणे दारूच्या नशेत पळून गेलेल्या एका व्यक्तींविरोधात पहिला माहिती अहवाल ( FIR ) रद्द करण्यास नकार दिला. विलेपार्ले येथे महामार्गावर मद्यपान करून वाहन चालवणाऱ्यांना रोखण्यासाठी रात्रीच्या गस्तीवर असलेल्या उपनिरीक्षकाने 2 फेब्रुवारी, 2019 रोजी एफआयआर दाखल केला होता. रात्रीच्या 1.50 वाजता एका कारचा चालक थांबला नाही एका बॅरिकेडवर धडकला आणि त्याचा पाठलाग करून अंधेरी पुलाजवळ थांबवण्यात आला. पोलिसांच्या लक्षात आले की दोन कारमध्ये दोन महिलांसह सात लोक होते. पोलिसांनी सांगितले की पहिल्या कारचा चालक दारूच्या नशेत होता. त्याने ब्रीथलायझर नाकारला आणि लाच देण्याचा प्रयत्नही केला. त्याची चाचणी सकारात्मक आली आणि त्याच्याकडे वाहन चालवण्याचा परवानाही नव्हता, असे पोलिसांनी म्हटले आहे.
या गाडीमधील काही लोकांनी त्यांच्या फोनवरून व्हिडिओ शूट करण्याचा प्रयत्न केला. दंडाच्या पावतीवर सही करण्यास नकार देत बाचाबाची झाली. एफआयआरमध्ये सात जणांनी पोलीस कर्मचार्यांना शिवीगाळ केल्याचा आणि घटनास्थळी पाठवलेल्या अतिरिक्त कर्मचार्यांनाही मारहाण केल्याचा आरोप आहे.
हेही वाचा -Pravin Darekar On Nanar Project : नानारबाबत शिवसेनेचं मतपरिवर्तन झालं असेल तर ठामपणे सांगा : दरेकरांचं आव्हान