मुंबई -काँग्रेस नेते नसीम खान यांनी शिवसेना आमदार दिलीप लांडे यांच्याविरोधात मुंबई उच्च न्यायालयात निवडणूक याचिका दाखल केली होती. साल 2019 च्या विधानसभा निवडणुकीवेळी उमेदवार दिलीप लांडे यांनी निवडणूक आयोगाने दिलेल्या नियमाचे उल्लंघन करत तसेच त्यांची बदनामी करण्यात आल्याच्या विरोधात याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेवर गुरुवारी मुंबई उच्च न्यायालयाने निकाल देत नसीम खान यांची याचिका फेटाळून लावली आहे. दिलीप लांडे यांसाठी मोठा दिलासा मानला जात आहे.
साल 2019 च्या विधानसभा निवडणुकांत नसीम खान यांचा शिवसेना उमेदवार दिलीप लांडे यांनी अवघ्या 409 मतांनी पराभव केला होता. चांदिवली विधानसभा मतदार संघातून या दोघांनी एकमेकांविरोधात निवडणूक लढवली होती. त्याविरोधात निवडणुकीवेळी मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाल्याचा ठपका ठेवत मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. मुंबई उच्च न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावली आहे.
शिवसेना आमदार दिलीप लांडे यांना दिलासा.. त्यांच्याविरोधातील नसीम खान यांची याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली - मुंबई उच्च न्यायालयाने नसीम खान यांची याचिका फेटाळली
काँग्रेस नेते नसीम खान यांनी शिवसेना आमदार दिलीप लांडे यांच्याविरोधात मुंबई उच्च न्यायालयात निवडणूक याचिका दाखल केली होती. साल 2019 च्या विधानसभा निवडणुकीवेळी उमेदवार दिलीप लांडे यांनी निवडणूक आयोगाने दिलेल्या नियमाचे उल्लंघन करत तसेच त्यांची बदनामी करण्यात आल्याच्या विरोधात याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेवर गुरुवारी मुंबई उच्च न्यायालयाने निकाल देत नसीम खान यांची याचिका फेटाळून लावली आहे.
नसीम खान यांच्या याचिकेनुसार 20 ऑक्टोबर 2019 रोजी म्हणजेच मतदानाच्या आदल्या दिवशी शिवसेना कार्याध्यक्ष आणि सध्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी परिवहन मंत्री अनिल परब आणि अभिनेता मिलिंद गुणाजी यांच्यासोबत निवडणूक आयोगाने निश्चित केलेल्या कालावधीपेक्षा जास्तकाळ प्रचार केला होता. या प्रकरणी आपण लांडे यांच्या विरोधात निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रारही दाखल केली होती. मात्र निवडणूक आयोगाने आपल्या तक्रारीवर काहीच कारवाई केली नाही, असा दावा नसीम खान यांनी आपल्या याचिकेतून केला होता.
निवडणूक आयोगाने प्रचारासाठी दिलेल्या मुदतीनंतरही ठाकरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी लांडे यांच्यासाठी केलेल्या बेकायदा प्रचारामुळे आपला अवघ्या काही मतांनी पराभव झाल्याचा दावाही खान यांनी या याचिकेतून केला होता. तसेच या निवडणूक प्रचारात आपण पाकिस्तान झिंदाबाद च्या घोषणा दिल्याची खोटी चित्रफितही विरोधकांनी समाजमाध्यमाद्वारे सर्वदूर पसरवल्याचा आरोप नसीम खान यांनी याचिकेतून केला होता.