महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

जान्हवी कुकरेजा हत्याकांडातील प्रियकर आरोपीचा जामीन अर्ज उच्च न्यायालयाने फेटाळला - मुंबई जान्हवी कुकरेजा मर्डर अपडेट बातमी

पार्टी दरम्यान आपला 23 वर्षीय प्रियकर श्री जोगधनकर याला बालमैत्रीण दिया पडळकर सोबत नको त्या अवस्थेत पाहिल्यानंतर जान्हवी अस्वस्थ झाली. याच मुद्यावरून तिघांमध्ये इमारतीच्या जिन्यावर जोरदार वाद झाला. त्यानंतर इमारतीच्या पाचव्या मजल्यावर तिघांमध्ये कडाक्याचे भांडण सुरू झालं. अचानक श्री जोगधनकर बालमैत्रीण दिया पडळकर यांनी मिळून जान्हवीला अमानुष मारहाण सुरू केली. त्यातच जान्हवीचा मृत्यू झाला. मृत्यूनंतर केलेल्या तपासणीत जान्हवीच्या शरीरावर मारहाणीच्या फरफटत नेल्याच्या आणि भिंतीवर आपटल्याच्या एकूण 48 जखमा आढळल्या.

mumbai high court rejects bail plea of ​​janhvi kukrejas boyfriend in high profile murder case
जान्हवी कुकरेजा

By

Published : Jul 7, 2022, 4:23 PM IST

मुंबई - नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी खार येथे झालेल्या जान्हवी कुकरेजा या तरुणीच्या हत्याकांडाने मुंबई हादरली होती. या प्रकरणातील आरोपी जान्हवीचा प्रियकर श्री जोगधनकर याचा जामीन अर्ज मुंबई सत्र न्यायालयाने आज गुरुवार दिनांक 7 रोजी झालेल्या सुनावणी दरम्यान फेटाळून लावला आहे. खार परिसरात हायप्रोफाईल सोसायटीमध्ये 31 डिसेंबर 2020 यांच्यामध्ये रात्री हत्याकांड घडले होते.


परिस्थितीजन्य पुरावे - न्यायमूर्ती भारती डांगरे यांच्यासमोर यावर सुनावणी झाली. याप्रकरणात जान्हवीची बालमैत्रीण दिया पडळकर आणि जान्हवीचा प्रियकर श्री जोगधनकर यांच्यावर जान्हवीची हत्या केल्याचा आरोप आहे. मुंबई पोलिसांनी दाखल केलेल्या आरोपत्रात या दोघांनी मिळून जान्हवीची हत्या केल्याचा आरोप मुंबई पोलिसांनी केला आहे. ही हत्या झाली तेव्हा कोणीही प्रत्यक्षदर्शी साक्षीदार नसला तरी न्यायवैद्यक अहवाल पार्टीत उपस्थितांचे जबाब त्यातून समोर आलेले परिस्थितीजन्य पुरावे आरोपींचा दोष सिद्ध करण्यास पुरेसे आहेत असा दावा मुंबई पोलिसांनी केला आहे.



तिघेही त्यावेळी मद्याच्या नशेत -19 वर्षीय जान्हवी कुकरेजा ही मानसशास्त्र शाखेची विद्यार्थिनी होती. खार येथील भगवती हाईट्स इमारतीच्या गच्चीवर तिच्या मित्रांनी थर्टा फर्स्टनिमित्तानं आयोजित केलेल्या पार्टीत ती आपली बालपणीची मैत्रीण दिया पडळकर आणि प्रियकर श्री जोगधनकर सोबत सहभागी झाली होती. तिथं उपस्थितांसह हे तिघेही त्यावेळी मद्याच्या नशेत होते. पार्टी दरम्यान आपला 23 वर्षीय प्रियकर श्री जोगधनकर याला बालमैत्रीण दिया पडळकर सोबत नको त्या अवस्थेत पाहिल्यानंतर जान्हवी अस्वस्थ झाली. याच मुद्यावरून तिघांमध्ये इमारतीच्या जिन्यावर जोरदार वाद झाला. त्यानंतर इमारतीच्या पाचव्या मजल्यावर तिघांमध्ये कडाक्याचे भांडण सुरू झालं. अचानक श्री जोगधनकर बालमैत्रीण दिया पडळकर यांनी मिळून जान्हवीला अमानुष मारहाण सुरू केली. त्यातच जान्हवीचा मृत्यू झाला. मृत्यूनंतर केलेल्या तपासणीत जान्हवीच्या शरीरावर मारहाणीच्या फरफटत नेल्याच्या आणि भिंतीवर आपटल्याच्या एकूण 48 जखमा आढळल्या.

न्यायवैद्यक प्रयोग शाळेतील 10 तज्ञांचेही जबाब -मुंबई पोलिसांनी याप्रकरणी एकूण 74 साक्षीदारांच्या जबानी या आरोपपत्रात नोंदवल्या आहेत. यात न्यायवैद्यक प्रयोग शाळेतील 10 तज्ञांचेही जबाब असून त्यांनी केलेल्या विविध चाचण्यांचे अहवालही जोडलेले आहेत. ही घटना घडण्याआधी श्री जोगधनकर बालमैत्रीण दिया पडळकर सोबत जिन्यावरून खाली उतरताना गच्चीवर जान्हवीला रडताना आणि आरोपी दियाला तिची जखम साफ करताना पाहिल्याचं काहींनी म्हटलं आहे. तसेच घटनेनंतर मुख्य आरोपी श्री जोगधनकर रक्ताळलेल्या कपड्यांनी इमारतीबाहेर पडतानाचे सीसीटीव्ही चित्रणही पोलिसांनी आरोपपत्रात जोडलेलं आहे. मात्र आपण जिन्यात धडपडल्याचं सांगत श्री जोगधनकरनं सायनच्या लोकमान्य टिळक रुग्णालयात तर बालमैत्रीण दिया पडळकरने हिंदुजा रुग्णालयात उपचार घेतले होते.


काय आहे प्रकरण? -मुंबईतील खार परिसरात असणाऱ्या भगवती हाइट्स या इमारतीत 31 डिसेंबर 2020 च्या मध्ये नववर्षाच्या सुरुवातीलाच जान्हवी कुकरेजा या 19 वर्षांच्या तरुणीचा मृतदेह सापडला होता. त्यानंतर पोलिसांनी जान्हवीचा बॉयफ्रेंड श्री जोगधनकर आणि बालमैत्रीण दिया पडळकर यांना अटक केली होती. या हत्या प्रकरणातील प्राथमिक माहितीनुसार जान्हवीनं दोन्ही आरोपींना अश्‍लील कृत्य करताना पाहिलं होतं. यानंतर या तिघांमध्ये भांडण सुरू झालं. या भांडणातून दोन्ही आरोपींनी योजना आखून जान्हवीची हत्या केली. खार पोलीस आणि फॉरेन्सिक तज्ज्ञांनी पुन्हा एकदा क्राईम सीन तयार केला होता. मात्र अजूनही त्यांना हत्येचा उद्देश सिद्ध करता आलेला नाही. पोलिसांनी या प्रकरणातल्या आरोपींच्या DNA रिपोर्टच्या आधारे घटनास्थळी सापडलेल्या पुराव्यांची पडताळणी केली होती.

ABOUT THE AUTHOR

...view details