मुंबई -महापालिका निवडणुकांसाठी बहुसदस्यीय प्रभाग रचना ( Multi Member Ward Structure ) रद्द करा, अशी मागणी करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली आहे. पालिका आणि नगरपालिका निवडणुकीत बहुसदस्यीस प्रभाग पद्धती रचना ही योग्य आहे, असे न्यायालयाने म्हटले ( Mumbai High Court Rejected Petition ) आहे.
राज्य सरकारने महानगरपालिका व नगरपरिषदा, नगरपंचायतीमध्ये बहुसदस्यीय प्रभागाची तरतूद लागू केली होती. त्याविरोधात पुण्यातील परिवर्तन संस्थेतर्फे तन्मय कानिटकर आणि पिंपरी चिंचवडचे माजी नगरसेवक मारुती भापकर यांच्यावतीने अॅड. असीम सरोदे यांनी दोन याचिका दाखल केल्या होत्या. मारुती भापकर यांच्या याचिकेत 74 व्या घटनादुरुस्तीनुसार विभाग सभा घेण्याचे नियम आधी तयार करा. तोपर्यंत बहुसदस्यीय पद्धतीला स्थगिती द्या, अशी मागणी करण्यात आली होती.
सरकारला दिलासा -सरकारने दिलेल्या निर्णयामुळे राज्य सरकारला दिलासा मिळाला आहे. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका प्रभाग पद्धतीनेच होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. तर, दोन दिवसांपूर्वीच सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका दोन आठवड्यात घेण्याचे आदेश सरकारला दिले आहेत.