मुंबई :बॉलीवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला कॉर्डेलिया क्रुझ ड्रग्ज पार्टी प्रकरणात (Aryan Khan Cordelia Cruz Drug Party) अटक करण्यात आली होती. या प्रकरणातील आरोपी मुनमुन धामेचाने (Munmun Dhamecha Cordelia Cruz Drug Party) मुंबई उच्च न्यायालयात (Mumbai HC grants relief Munmun Dhamecha) धाव घेतली होती. एनसीबी कार्यालयात हजेरी लावण्यातची अट शिथिल (Munmun Dhamecha NCB Office Attendance Condition) करण्यात यावी याकरिता अर्ज दाखल (Munmun Dhamecha High Court Application) केला होता. या अर्जाला आज मुंबई उच्च न्यायालयाने मंजुरी देत दिलासा दिला आहे.
Munmun Dhamecha : कॉर्डेलिया क्रुझ ड्रग्ज पार्टी प्रकरण; मुनमुन धामेचाला मुंबई उच्च न्यायालयाचा दिलासा - मुनमुन धामेचाला मुंबई उच्च न्यायालयाचा दिलासा
कॉर्डेलिया क्रुझ ड्रग्ज पार्टी प्रकरणात आरोपी मुनमुन धामेचाने (Munmun Dhamecha Cordelia Cruz Drug Party) मुंबई उच्च न्यायालयात (Mumbai HC grants relief Munmun Dhamecha) धाव घेतली होती. एनसीबी कार्यालयात हजेरी लावण्यातची अट शिथिल (Munmun Dhamecha NCB Office Attendance Condition) करण्यात यावी याकरिता अर्ज दाखल (Munmun Dhamecha High Court Application) केला होता. या अर्जाला आज मुंबई उच्च न्यायालयाने मंजुरी देत दिलासा दिला आहे.
हजेरीची अट शिथिल करण्याचा मागणी-मुनमुन धामेचाच्या वतीने वकील आली काशीफ खान देशमुख यांनी मुंबई उच्च न्यायालयामध्ये अर्ज दाखल केला होता. यावेळी त्यांनी असा युक्तिवाद केला की, आरोपी मुनमुन दामेजाकडे आरोप पत्रामध्ये दाखवलेले अंमली पदार्थाचे प्रमाण कमी आहे. तसेच आरोपीला मुंबईत कुठलेही नातेवाईक राहत नसल्याने हजेरीच्या वेळी दिल्लीतून मुंबई हजेरी लावण्याकरिता यावे लागत आहे. त्यामुळे आरोपीची हजेरी शिथिल करण्यात यावी, याकरिता अर्ज दाखल केला होता. या अर्जावर न्यायमूर्ती भारती डांगरे यांनी मंजूर करत आरोपीला दिलासा दिला आहे.
8 जणांवर कारवाई -2 ऑक्टोबर रोजी मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या कॉर्डेलिया क्रूजवर एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी छापा मारला होता. या छाप्याचे नेतृत्व एनसीबी मुंबईचे तत्कालीन झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांनी केले होते. या क्रूजवर ड्रग पार्टी सुरू आहे, अशी माहिती तेव्हा एनसीबी अधिकाऱ्यांना मिळाली होती. मात्र कारवाईदरम्यान एनसीबी टीमने आर्यन खान अरबाज मर्चंट, मुनमुन धामेचा या तिघांसोबत एकूण आठ जणांना ताब्यात घेतले होते.
निर्दोष सुटण्याचा मार्ग मोकळा -एनसीबी कडून दाखल करण्यात आलेल्या आरोपपत्रात आर्यन खान, आविन साहू, गोपाळ जी आनंद, समीर सेहगल, भास्कर अरोडा, मानव सिन्हा या 6 आरोपीबद्दल पुरव्याअभावी आरोपपत्रात कुठलेही आरोप एनसीबी कडून करण्यात आले नव्हते. यामुळे त्यांना या केसमधून निर्दोष सुटण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. एनसीबी कडून एकूण 6000 पानांचे आरोपपत्र 27 मे शुक्रवार सादर करण्यात आलं आहे. NCB ने कॉर्डेलिया क्रूझ ड्रग्ज प्रकरणी आरोपपत्र सादर केले. त्यानंतर आर्यन खानला एनसीबीने ड्रग्ज प्रकरणी अटक केली होती. एकूण 10 खंडांचे आरोपपत्र सादर करण्यात आले आहे. जे सध्या न्यायालयाच्या रजिस्ट्रीमध्ये आहे. या प्रकरणात तपास विशेष एनसीबी एसआयटी करतेय. मार्च महिन्याच्या अखेरीस कोर्टाने एसआयटीला आरोपपत्र दाखल करण्यासाठी 60 दिवसांची मुद्दत वाढवून दिली होती. 2 ऑक्टोबर 2021 रोजी एनसीबीने क्रूजवर धाड टाकत ड्रग्जप्रकरणी कारवाई केली होती. कॉर्डेलिया क्रूज ड्रग प्रकरणी एकूण 20 लोकांवर अटकेची कारवाई करण्यात आली होती.
नेमकं प्रकरण काय?
मुंबई एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांनी 2 ऑक्टोबर रोजी कार्डेलिया जहाजावर धाड टाकली होती. यावेळी जहाजावर रेव्ह पार्टी सुरु असल्याचे उघडकीस आले होते. या ठिकाणी अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला अटक करण्यात आली होती. आर्यन खान हा 27 दिवस जेलमध्ये रहावे लागले होते. एनसीबी अधिकाऱ्यांनी आर्यनचे व्हाट्सअॅप चॅट मिळवले होते. यात अनेक प्रसिद्ध व्यक्तींचा समावेश आहे. यात अभिनेत्री अनन्या पांडे हिचेदेखील नाव आहे. आर्यन खान आणि अनन्या यांच्यात ड्रग्सबाबत चर्चा झाल्याचे एनसीबी अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. या दोघांतील व्हाट्सअॅप संवाद एनसीबी अधिकाऱ्यांनी कोर्टात सादर केला होता. त्यामुळे आर्यनला जामीन मिळण्यास अडचण झाली होती. मुंबई विशेष न्यायालयाने आर्यन खानची जामीन फेटाळून लावली होती; मात्र त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयात आर्यन खानने जामीन अर्ज दाखल केला होता. त्यानंतर तीन दिवस सलग सुरू असलेल्या युक्तिवादानंतर अखेर आर्यन खानला जामीन मंजूर करण्यात आला होता.