महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Mansukh Hiren Case : आरोपी नरेश गौरला मुंबई उच्च न्यायालयाकडून दिलासा

नरेश गौरला मुंबई उच्च न्यायालयाने दिलासा ( Mumbai High Court Granted Relief ) दिला असून एनआयए मुंबई उच्च न्यायालयाने फटकारले आहे. नरेश गौर यांनी मुंबई उच्च न्यायालयात मुंबई सत्र न्यायालयाने दिलेल्या स्थगिती विरोधात याचिका केली होती. या याचिकेवर यापूर्वीच युक्तिवाद झाला होता. न्यायालयाने आपला निकाल रोखून ठेवला होता. आज (बुधवार) रोजी मुंबई उच्च न्यायालयाने अखेर नरेश गौर यांना जामीन ( Mumbai High Court finally Granted Bail to Naresh Gaur ) मंजूर केला आहे.

प्रातिनिधीक फोटो
प्रातिनिधीक फोटो

By

Published : Dec 8, 2021, 6:53 PM IST

मुंबई -जगप्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया स्कॉर्पियो स्फोटक ( Antilia Case ) आणि मनसूख हिरेन हत्या ( Mansukh Hiren Case ) प्रकरणातील आरोपी नरेश गौरला मुंबई उच्च न्यायालयाने दिलासा ( Mumbai High Court Granted Relief ) दिला असून एनआयए मुंबई उच्च न्यायालयाने फटकारले आहे. नरेश गौर यांनी मुंबई उच्च न्यायालयात मुंबई सत्र न्यायालयाने दिलेल्या स्थगिती विरोधात याचिका केली होती. या याचिकेवर यापूर्वीच युक्तिवाद झाला होता. न्यायालयाने आपला निकाल रोखून ठेवला होता. आज (बुधवार) रोजी मुंबई उच्च न्यायालयाने अखेर नरेश गौर यांना जामीन ( Mumbai High Court finally Granted Bail to Naresh Gaur ) मंजूर केला आहे. 25 फेब्रुवारीला मुकेश अंबानी यांच्या मुंबईतील अँटिलिया या निवासस्थानाजवळ विस्फोटके ठेवलेली एक स्कार्पिओ आढळली होती. ठाण्याचे व्यावसायिक मनसूख हिरेन यांच्या नावावर ही स्कार्पिओ होती. त्यानंतर 5 मार्च या दिवशी ठाण्याच्या खाडीत मनसूख हिरेन यांचा मृतदेह सापडला होता.


याप्रकरणी एनआयए कोर्टाने आरोपी नरेश गौरीला जामीन मंजूर केला होता. मात्र त्या आदेशाला 25 दिवसांची स्थगिती दिली होती. या स्थगितीला गौरने मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. मात्र ही स्थगिती उठवत न्यायालयाने गौरला मोठा दिलासा दिला आहे. गौर या प्रकरणातील दुसरा आरोपी आहे. अँटिलिया स्फोटके आणि मनसूख हिरेन प्रकरणात गौर याच्या कथित सहभागामुळे त्याला अटक करण्यात आली होती. गौरवर सिम पुरवठा करणे आणि कटात सहभागी होण्याचा आरोप आहे. बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे हा या प्रकरणातील मुख्य आरोपी आहे. नरेश गौरच्या बाजूने वरिष्ठ अधिवक्ता शिरीष गुप्ते आणि अॅड. अनिकेत निकम यांनी युक्तिवाद केला. तर एनआयएतर्फे एएसजी अनिल सिंग आणि अ‌ॅड संदेश पाटील यांनी युक्तिवाद केला.

  • काय आहेत नरेश गौरवरील आरोप?

मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती संदीप के. शिंदे यांनी नरेश गौरच्या जामिनासंदर्भात आज हा निकाल दिला. जामिन स्थगिती आदेशाच्या बाजूने युक्तिवाद करताना एनआयएचे वकील संदेश पाटील यांनी एनआयए कोर्टाच्या आदेशाची पाठराखण केली. मात्र पाटील यांनी केलेला युक्तिवाद न्यायालयाने फेटाळून लावत स्थगिती आदेश रद्द केला. जेणेकरून नरेश गौर याची आता तुरुंगातून जामिनावर सुटका होऊ शकते. अँटिलिया प्रकरणात मुख्य आरोपी सचिन वाझे आणि सहआरोपी प्रदीप शर्मा यांच्यासाठी सिमकार्ड खरेदी केल्याचा आरोप क्रिकेट बुकी नरेश गौरवर करण्यात आला असून विशेष न्यायालयाने काही दिवसांपूर्वी गौरचा जामीन मंजूर केला होता.

हेही वाचा -ओबीसी आरक्षणाचा निर्णय होईपर्यंत सर्व निवडणुका रद्द करा, भाजपची मागणी

ABOUT THE AUTHOR

...view details