मुंबई -अभिनेता अरमान कोहलीला मुंबई उच्च न्यायालयाने दिलासा दिला आहे. एनसीबीने दाखल केलेल्या एनडीपीएसच्या खटल्यात 1 लाखांच्या जामीनावर सुटका Actor Armaan Kohli mumbai High Court granted bail करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहे. अभिनेता सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणानंतर एनसीबीने ड्रग्स प्रकरणात अटक करण्यात आली होती. एनसीबीने अरमान कोहलीला 2021 मध्ये अटक केली होती.
अभिनेता सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणानंतर एनसीबीने अनेक कलाकारांवर छापेमारी करण्यात आली होती. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने 1.2 ग्रॅम कोकेन ताब्यात घेतल्याबद्दल अटक केली होती. यापूर्वी अरमान कोहली चे मुंबई सत्र न्यायालय आणि मुंबई उच्च न्यायालयाने जामीन फेटाळला होता. कोहलीला नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने 1.2 ग्रॅम कोकेन ताब्यात घेतल्याबद्दल अटक केली होती. हे प्रमाण सेवनासाठी असलेल्या लहान श्रेणीमध्ये येते, असे अरमानच्या वकीलाचे म्हणणे आहे. एका ड्रग तस्कराला अटक केल्यानंतर त्याला अटक करण्यात आली होती आणि नंतर NCB ने देखील अटक केली होती. याप्रकरणामध्ये अम्ली पदार्थ विकणारा व्यक्ती कुणी दुसराच असल्याचे सांगण्यात आले आहे.
एनसीबीची तक्रारीत असे म्हटले आहे की, या प्रकरणातील दोन आरोपी हे मुख्य पुरवठादार होते. जे नियमितपणे अंमली पदार्थांचा पुरवठा करत होते. त्यांनी आरोप केला की, आरोपींच्या भूमिका एकमेकांशी जोडलेल्या आणि गुंफलेल्या आहेत. आणि वेगळ्या पद्धतीने हाताळल्या जाऊ शकत नाहीत. युक्तिवादादरम्यान आरमानच्या वकीलाने अभिनेत्री रिया चक्रवर्ती प्रकरणावर टीका केली. ज्याला 2020 मध्ये नोंदवलेल्या गुन्ह्यात एनसीबीने अजामीनपात्र कलम लावले होते. परंतु उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला होता.