महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Minor Daughter Rape Case : मुलीचे लैंगिक शोषण करणाऱ्या पित्याला पाच वर्षांची शिक्षा; आरोपीचा न्यायालयात धक्कादायक युक्तीवाद

पाच वर्षाच्या मुलीचे लैंगिक शोषण ( Minor Daughter Rape Case ) करणाऱ्या एका नराधम पित्याला मुंबई उच्च न्यायालयाने ( Mumbai High Court ) पाच वर्षांची शिक्षा सुनावली ( Man Gets 5 Year Jail ) आहे.

mumbai high court
mumbai high court

By

Published : Apr 18, 2022, 5:54 PM IST

मुंबई -पाच वर्षाच्या मुलीचे लैंगिक शोषण ( Minor Daughter Rape Case ) करणाऱ्या एका नराधम पित्याला मुंबई उच्च न्यायालयाने ( Mumbai High Court ) पाच वर्षांची शिक्षा सुनावली ( Man Gets 5 Year Jail ) आहे. या व्यक्तीने कोर्टात सादर केलेला युक्तिवाद हा धक्कादायक असल्याचे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले आहे.

एका चाळीस वर्षीय पित्याने आपल्या पाच वर्षाच्या मुलीचे लैंगिक शोषण केल्याचा धक्कादायक प्रकार पोक्सो अंतर्गत नोंदविण्यात आला होता. या खटल्याची आज (सोमवार) सुनावणी झाली. यावेळी न्यायाधीशांनी आरोपीला पाच वर्षांची शिक्षा सुनावली आहे. मुलीचा पिता हा अत्यंत जवळचा विश्वास पात्र व्यक्ती आणि तिचा संरक्षक असतो. मात्र, असे असतानाही पित्यानेच आपल्या मुलीचे लैंगिक शोषण करणे हे धक्कादायक असल्याचे निरीक्षण न्यायाधीश एच. सी. शिंदे यांनी नोंदवले आहे.

आरोपीने केला धक्कादायक युक्तीवाद - या खटल्यातील आरोपीने अत्यंत धक्कादायक युक्तीवाद न्यायालयासमोर केला. त्याच्या म्हणण्यानुसार, त्याने आपल्या मुलीच्या गुप्तांगाला बोटाने स्पर्श केल्याची तक्रार मुलीने केलेली नाही. त्याच्या युक्तिवादाने न्यायाधीशही चक्रावून गेले. पोक्सो कायदा अंतर्गत पीडितेला कशाप्रकारे स्पर्श केल्यास गुन्हा ठरतो याची स्पष्टता या कायद्यात नसल्याचे निरीक्षण ही न्यायालयाने नोंदवले आहे. त्वचेचा त्वचेला स्पर्श नसल्याने हा गुन्हा ठरत नाही, असा युक्तिवाद आरोपीच्या वकिलांनी केला होता. मात्र, न्यायालयाने तो फेटाळून लावला.

तीन वर्षापूर्वी गुन्हा दाखल -मुलगी पाच वर्षाची असताना तिचे वर्तन योग्य नसल्याचे तिच्या शिक्षकांनी मुलीच्या आईला लक्षात आणून दिले होते. त्यानंतर या संदर्भात मुलीच्या आईने पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्यात आरोपीला पाच वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली. आरोपी स्वतः मुलीचा वडील असल्याने त्याला दयेचा अर्ज करण्यासचीही मुभा असू नये, अन्यथा तो कायद्याचा उपहास होईल, असेही न्यायालयाने म्हटले आहे.

हेही वाचा -INS Vikrant Fraud Case : किरीट सोमैयांची 3 तास चौकशी; बाहेर आल्यानंतर म्हणाले...

ABOUT THE AUTHOR

...view details