मुंबई -भीमा कोरेगाव ( Bhima Koregaon Case ) आणि एल्गार परिषद ( Elgar Parishad ) माओवाद्यांशी संबंध प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेले आणि सध्या वैद्कीय जामीनावर असलेले 82 वर्षीय तेलुगु कवी वरवरा राव ( Vara Vara Rao Bail ) यांना जामीन याचिकेवर दिलेला दिलासा कायम ठेवला होता. वरवरा राव यांना आत्मसमर्पण करण्याची मुदत 28 फेब्रुवारी रोजी संपणार होती. शनिवारी झालेल्या सुनावणीदरम्यान मुंबई उच्च न्यायालयाने वरावरा राव यांची ( Vara Vara Rao Surrender Date Increase ) आत्मसमर्पणाची मुदत 3 मार्चपर्यंत वाढवली आहे.
जामीन अर्जाला एनआयएचा विरोध -
भीमा कोरेगाव हिंसा प्रकरणातील आरोपी वरावरा राव यांना सध्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे कोर्टाकडून जामीन मिळाला होता. वरावरा राव यांना 28 ऑगस्ट 2018 रोजी भीमा कोरेगाव जातीय हिंसाचार तसेच शहरी नक्षलवाद प्रकरणात अटक करण्यात आली होती आणि त्यांना तळोजा मध्यवर्ती कारागृहात ठेवण्यात आले होते. वरावरा राव यांनी फेब्रुवारी 2021मध्ये उच्च न्यायालयाने त्यांना मंजूर केलेल्या वैद्यकीय जामीनाची मुदतवाढ मिळावी, या याचिकेवर आज सुनावणी करण्यात आली. त्यावेळी वरावरा राव यांना 3 मार्चपर्यंत आत्मसमर्पणाची मुदत वाढवून देण्यात आली आहे. मुंबई उच्च न्यायालयाचे
न्यायमूर्ती एसएस शिंदे आणि एनआर बोरकर यांच्या खंडपीठासमोर आज सुनावणी पार पडली. oरम्यान, एनआयएच्यावतीने राव यांच्या जामीन अर्जाला विरोध करण्यात आला. राव यांना गंभीर आजार झाला असल्याचे वैद्यकीय अहवालात नमूद कऱण्यात आलेले नाही. त्यामुळे त्यांना जामीन अवधी वाढवून देऊ नये, अशी मागणीही एनआयएने केली.