मुंबई -भीमा कोरेगाव ( Bhima Koregaon ) आणि एल्गार परिषद ( Elgar Parishad ) माओवाद्यांशी संबंध प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेले आणि सध्या वैद्कीय जामीनावर असलेले 82 वर्षीय तेलुगु कवी वरवरा राव ( Varvara Rao Get Relief ) यांना जामीन याचिकेवर दिलेला दिलासा कायम ठेवला होता. आज झालेल्या सुनावणीदरम्यान मुंबई उच्च न्यायालयाने वरावरा राव यांची आत्मसमर्पणाची मुदत 21 मार्चपर्यंत वाढ ( Varvara Rao Relief Extends ) देण्यात आली असल्याचा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे.
वरावरा राव यांना दिलासा -
भीमा कोरेगाव हिंसा प्रकरणातलेच्या आरोपी वरावरा राव यांना सध्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे कोर्टाकडून जामीन मिळाला होता. वरावरा राव यांना 28 ऑगस्ट 2018 रोजी भीमा कोरेगाव जातीय हिंसाचार तसेच शहरी नक्षलवाद प्रकरणात अटक करण्यात आली होती आणि त्यांना तळोजा मध्यवर्ती कारागृहात ठेवण्यात आले होते. भीमा कोरेगाव आरोपी वरावरा राव यांनी फेब्रुवारी 2021मध्ये उच्च न्यायालयाने त्याला मंजूर केलेल्या वैद्यकीय जामीनाची मुदतवाढ मिळावी, या याचिकेवर आज सुनावणी करण्यात आली. त्यावेळी वरावरा राव यांना 21 मार्चपर्यंत आत्मसमर्पणाची मुदत वाढवून देण्यात आली आहे. मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती एसएस शिंदे आणि एनआर बोरकर यांच्या खंडपीठासमोर आज सुनावणी पार पडत आहे.
जामीन अर्जाला एनआयएचा विरोध -