मुंबई -भीमा कोरेगाव ( Bhima Koregaon Case ) आणि एल्गार परिषद ( Elgar Parishad ) माओवाद्यांशी संबंध प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेले आणि सध्या वैद्कीय जामीनावर असलेले 82 वर्षीय तेलुगु कवी वरवरा राव ( Varavara Rao Bail ) यांना जामीन याचिकेवर दिलेला दिलासा कायम ठेवला होता. वरवरा राव यांना आत्मसमर्पण करण्याची मुदत 3 मार्चपर्यंत रोजी संपणार होती. मंगळवारी (दि. 1 मार्च) झालेल्या सुनावणीदरम्यान मुंबई उच्च न्यायालयाने ( Mumbai High Court ) वरावरा राव यांची ( Varavara Rao Surrender Date Increase ) आत्मसमर्पणाची मुदत 8 मार्चपर्यंत वाढवली आहे.
भीमा कोरेगाव हिंसा प्रकरणातील आरोपी वरावरा राव यांना सध्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे न्यायालयाकडून जामीन मिळाला होता. वरावरा राव यांना 28 ऑगस्ट, 2018 रोजी भीमा कोरेगाव हिंसाचार तसेच शहरी नक्षलवाद प्रकरणात अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्यांना तळोजा मध्यवर्ती कारागृहात ठेवण्यात आले होते. वरावरा राव यांनी फेब्रुवारी, 2021मध्ये उच्च न्यायालयाने ( Mumbai High Court ) त्यांना मंजूर केलेल्या वैद्यकीय जामीनाची मुदतवाढ मिळावी यासाठी अर्ज केला आहे. या याचिकेवर आज न्यायमूर्ती एस.एस. शिंदे आणि एन.आर. बोरकर यांच्या खंडपीठासमोर सुनावणी करण्यात आली. त्यावेळी वरावरा राव यांना 8 मार्चपर्यंत आत्मसमर्पणाची मुदत वाढवून देण्यात आली आहे.