मुंबई:माजी गृहमंत्री अनिल देशमुख ( Former Home Minister Anil Deshmukh ) यांच्या जामीन अर्जावर आज पुन्हा मुंबई उच्च न्यायालयामध्ये सुनावणी ( hearing Anil Deshmukh bail application ) होऊ शकली नाही. न्यायमूर्ती पृथ्वीराज चव्हाण यांनी अनिल देशमुख यांच्या जामीन अर्जावर सुनावणी घेण्यास नकार ( refused hearing Anil Deshmukh bail application ) दिला आहे. तसेच दुसऱ्या खंडपीठावर पुढे दाद मागण्याचे निर्देश अनिल देशमुख यांना दिले आहे. त्यामुळे अनिल देशमुख यांचा कारागृहातील मुक्काम आणखी वाढला आहे.
Anil Deshmukh Bail Application अनिल देशमुख यांच्या जामीन अर्जावर सुनावणी घेण्यास मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठाचा आजदेखील नकार - Anil Deshmukh bail application dated 5 August
माजी गृहमंत्री अनिल देशमुख ( Former Home Minister Anil Deshmukh ) यांच्या जामीन अर्जावर आज पुन्हा मुंबई उच्च न्यायालयामध्ये सुनावणी ( hearing Anil Deshmukh bail application ) होऊ शकली नाही. न्यायमूर्ती पृथ्वीराज चव्हाण यांनी अनिल देशमुख यांच्या जामीन अर्जावर सुनावणी घेण्यास नकार ( refused hearing Anil Deshmukh bail application ) दिला आहे. तसेच दुसऱ्या खंडपीठावर पुढे दाद मागण्याचे निर्देश अनिल देशमुख यांना दिले आहे.
जामीन अर्ज आतापर्यंत 3 वेळा नाकारला -आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात ईडीने मागील वर्षी अनिल देशमुख यांना 11 तासाच्या चौकशीनंतर अटक केली होती. सध्या अनिल देशमुख न्यायालयीन कोठडीत आहे. अनिल देशमुख यांचा जामीन अर्ज यापूर्वी मुंबई सत्र न्यायालयाने फेटाळल्यानंतर या निर्णयाविरोधात देशमुख यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र अद्यापही त्यांच्या अर्जावर सुनावणी होऊ शकली नाही. अनिल देशमुख यांच्या जामीन अर्ज आतापर्यंत 3 वेळा विविध खंडपीठाने नाकारला आहे. आज झालेल्या न्यायमूर्ती पृथ्वीराज चव्हाण यांच्या खंडपीठाने देखील सुनावणी घेण्यास नकार दिला आहे. अनिल देशमुख यांनी मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या जामीन अर्जावर सुनावणी होत नसल्याने सर्वोच्च न्यायालयात देखील धाव घेतले होते. त्यावेळी सर्वोच्च न्यायालयाने मुंबई उच्च न्यायालयाला निर्देश दिले होते की, अनिल देशमुख यांच्या अर्जावर लवकरात लवकर सुनावणी पूर्ण करण्यात यावे, असे निर्देश दिले होते; मात्र अनिल देशमुख यांच्या जामीन अर्ज वर न्यायमूर्ती सुनावणी घेण्यापासून नकार देत आहे.
शंभर कोटी रुपये वसुली करण्याचा टार्गेट -अनिल देशमुख यांच्यावर माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांनी मुख्यमंत्री आणि राज्यपाल यांना पत्र लिहून आरोप केल्यानंतर त्यांना गृहमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला होता. परमवीर सिंग यांनी पत्रात असे म्हटले होते की, निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना मुंबईतील बारा अँड रेस्टॉरंट मालकांकडून पैसे वसुली करण्याचे निर्देश अनिल देशमुख यांनी दिले होते. महिन्याला शंभर कोटी रुपये वसुली करण्याचा टार्गेट देण्यात आला होता, असे परमवीर सिंग यांनी म्हटले होते. त्यानंतर या प्रकरणाचा तपास सीबीआयने करावा याकरिता ऍडव्होकेट जयश्री पाटील यांनी मागणी केल्यानंतर या प्रकरणात सीबीआयने गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर या प्रकरणात ईडीने गुन्हा दाखल करत अनिल देशमुख यांना 2 नोव्हेंबर रोजी अटक केली होती. सध्या अनिल देशमुख न्यायालयीन कोठडीत असून ईडीने त्यांच्या विरोधात मुंबई सत्र न्यायालयातील विशेष पीएमएलए कोर्टामध्ये 7000 पानाचे आरोप पत्र दाखल केले आहे. यामध्ये अनिल देशमुख यांना प्रमुख आरोपी म्हणून दाखवण्यात आले असून सचिन वाझे, कुंदन शिंदे, संजीव पालांडे यांना सहआरोपी म्हणून दाखवण्यात आले आहे.
काय आहे प्रकरण?मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परंबिर सिंह यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना पत्र लिहून माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले होते. अनिल देशमुख यांनी सचिन वाझेला प्रत्येक महिन्याला शंभर कोटी रुपयांच्या वसुलीचा टारगेट दिला होता असे खळबळजनक आरोप परमवीर सिंग यांनी पत्राच्या माध्यमातून केले होते. यानंतर निलंबित API सचिन वाझे यांच्यावर या प्रकरणातील मुख्य आरोपी म्हणून अटकेची कारवाई करण्यात आली तसेच देशमुख यांचे खाजगी सचिव संजीव पालांडे आणि खाजगी सहसचिव कुंदन शिंदे यांनाही या प्रकरणात सीबीआयकडून अटक करण्यात आली होती. या प्रकरणात सर्व आरोपींना न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले आहे.