मुंबई - मुंबई उच्च न्यायालयामध्ये ( Mumbai High Court ) सर्वोच्च न्यायालयाच्या ( Supreme Court ) कोलिजीअमने अतिरिक्त न्यायमूर्तींच्या नावाची शिफारस केली होती. केंद्रीय विधी व न्यायमंत्री किरेन रिजीजू यांनी 16 जुलै रोजी याबाबतची अधिसूचना जारी करत 9 अतिरिक्त न्यायमूर्तींच्या निवडीला मंजुरी दिली आहे. मुंबई उच्च न्यायालयातील न्यायमूर्ती ए. के. मेनन यांच्या निवृत्तनंतर मुंबई उच्च न्यायालयाची न्यायमूर्तीची संख्या 54 वर आली होती. आता ती 63 वर गेली आहे. आता मुंबई उच्च न्यायालय 31 न्यायमूर्तींचे पदे अद्यापही रिक्त आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या कोलिजीअमने अतिरिक्त न्यायमूर्ती पदासाठी ऍड. किशोर संत, ऍड. वाल्मीकी मेन्झेस, ऍड. कमल खटा, ऍड. शर्मिला देशमुख, ऍड. अरुण पेडणेकर, ऍड. संदीप मारने, ऍड. गौरी गोडसे, ऍड. राजेश पाटील आणि ऍड. आरीफ डॉक्टर यांच्या नावाची शिफारस केली होती. केंद्रीय विधी व न्यायमंत्री किरेन रिजीजू यांनी आज याबाबतची अधिसूचना जारी केली आहे. या वकिलांच्या नावावर शिक्कामोर्तब केले आहे. मुंबई उच्च न्यायालयात न्यायमूर्तींची 94 पदे असून सध्या 45 कायमस्वरूपी व 9 अतिरिक्त न्यायमूर्ती कार्यरत आहेत. तर आणखी अतिरिक्त 9 न्यायमूर्तींची नियुक्ती करण्यात आल्याने उच्च न्यायालयातील न्यायमूर्तींची संख्या 63 इतकी झाली आहे.