मुंबई :आजपासून मुंबईकरांना हेल्मेट घालणे बंधनकारक असणार आहे.वाहतूक पोलिसांकडून याबाबत 25 मे रोजी परिपत्रक काढण्यात आले होते. या परिपत्रकाची अंमलबजावणी आजपासून सुरुवात होत आहे. मुंबईकरांना घराबाहेर पडताना हेल्मेट घालूनच बाहेर पडावे लागणार आहे. अन्यथा नियमाची पायामल्ली करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार आहे.
ई-चलानद्वारेही दंड :वाहतूक पोलीस आजपासून प्रत्येक ठिकाणी हेल्मेटशिवाय मोटारसायकल चालवणाऱ्यांसह मागे बसणाऱ्यांवर कारवाई करणार आहेत. त्यामुळे नियम मोडणाऱ्यांकडून ई-चलानद्वारेही दंड आकारला जाणार आहे. मुंबईत मोटारसायकल आणि मागे बसणाऱ्या व्यक्तींनाही हेल्मेट परिधान करणं बंधनकारक करण्यात आलं आहे. वाहतूक पोलिसांनी 25 मे रोजी हा आदेश जारी केला होता. हेल्मेट अनिवार्य असूनही बहुतांश दुचाकी चालक हेल्मेट घालत नाहीत. त्यामुळे रस्ते अपघातात मृतांची संख्या वाढली आहे, असं अधिसूचनेत पोलिसांनी म्हटले आहे.