महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Mumbai Heavy rain : मुंबईत या आठवड्यात सलग 6 दिवस समुद्राला मोठी भरती, प्रशासनाचे नागरिकांना आवाहन

पावसाळ्यात समुद्राला मोठी भरती असताना मुसळधार पाऊस ( Mumbai Heavy rain ) पडल्यास मुंबईत पाणी साचते. साचलेले पाणी समुद्रात सोडणे, शक्य नसल्याने वाहतूक ठप्प होऊन मुंबई थांबते. या 6 दिवसात समुद्रामध्ये 4 मीटरपेक्षा उंच लाटा उसळणार आहेत. यामुळे नागरिकांनी समुद्र किनारी जाऊ नये, असे आवाहन महापालिका ( Municipal Corporation ) प्रशासनाने केले आहे.

Mumbai Heavy rain
Mumbai Heavy rain

By

Published : Jul 13, 2022, 8:50 AM IST

Updated : Jul 13, 2022, 8:59 AM IST

मुंबई - मुंबईत गेले काही दिवस मुसळधार पाऊस ( Heavy rain ) पडत आहे. मंगळवार ते गुरुवार पावसाचा ऑरेंज अलर्ट ( Mumbai Rain Orange alert ) देण्यात आला आहे. त्यातच आता सलग 6 दिवस समुद्राला मोठी भरती आहे. या 6 दिवसात समुद्रामध्ये 4 मीटरपेक्षा उंच लाटा उसळणार आहेत. यामुळे नागरिकांनी समुद्र किनारी जाऊ नये, असे आवाहन महापालिका ( Municipal Corporation ) प्रशासनाने केले आहे.

6 दिवस समुद्राला मोठी भरती -पावसाळ्यात समुद्राला मोठी भरती असताना मुसळधार पाऊस ( Mumbai Heavy rain ) पडल्यास मुंबईत पाणी साचते. साचलेले पाणी समुद्रात सोडणे, शक्य नसल्याने वाहतूक ठप्प होऊन मुंबई थांबते. 29 जून पासून मुंबईत मुसळधार पाऊस पडत आहे. 13 जुलै पासून 15 जुलै पर्यंत मुसळधार पाऊस पडेल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यातच मुंबईच्या समुद्रात 13 जुलै ते 18 जुलै सलग 6 दिवस समुद्राला मोठी भरती आहे. समुद्रात 4 मीटरपेक्षा मोठ्या लाटा उसळण्याची शक्यता आहे. या कालावधीत मोठा पाऊस पडल्यास मुंबई ठप्प होऊ शकते.

सलग 6 दिवस समुद्राला मोठी भरती,

समुद्रावर जाऊ नका -मुंबईमध्ये पावसाचा रेड आणि ऑरेंज अलर्ट दिला असल्यास या दिवशी सकाळी 6 ते सकाळी 10 या वेळेतच समुद्र किनारी जाण्यास परवानगी देण्यात आली आहे. इतर वेळी समुद्रावर जाण्यास बंदी घालण्यात आली आहे. मुंबईत पुढील 6 दिवस समुद्राला मोठी भरती असल्याने नागरिक आणि पर्यटकांनी समुद्र किनारी जाऊ नये, असे आवाहन पालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे.13 जुलै 4.68 मीटर सकाळी 11.44 , 14 जुलै 4.82 मीटर दुपारी 12.33 , 15 जुलै 4.87 मीटर दुपारी 1.22 , 16 जुलै 4.85 मीटर दुपारी 2.8 , 17 जुलै 4.73 मीटर दुपारी 2.54 , 18 जुलै 4.51 मीटर दुपारी 2.38 होण्याची शक्यता आहे.

Orange alert in Mumbai : मुंबईतही पुढील 3 दिवस मुसळधार पावसाची शक्यता, ऑरेंज अलर्ट जारी - - गेल्या आठवड्यात मुंबई आणि मुंबई उपनगरांमध्ये जोरदार पाऊस झाला ( Mumbai rains update news ) होता. मात्र मागील दोन दिवसांपासून मुंबईत पावसाने काहीशी विश्रांती घेतलेली पाहायला मिळाली. अधूनमधून पावसाच्या जोरदार सरी मुंबईवर बरसत असल्या तरी, राज्याच्या विविध भागांमध्ये होत असणाऱ्या मुसळधार पावसाच्या तुलनेने मुंबई पावसाची संततधार नव्हती. मात्र पुढील 3 दिवस पुन्हा एकदा मुंबई, मुंबई उपनगरात आणि ठाणे जिल्ह्यात मुसळधार पाऊस होऊ शकतो अशी शक्यता हवामान विभागाकडून वर्तविण्यात ( Mumbai rains prediction ) आली आहे. मुंबई ठाण्यासह कोकणात मुसळधार ( Mumbai rain prediction news ) पाऊस होईल अशी शक्यता हवामान विभागाचे शास्त्रज्ञ के. एस. होसाळीकर यांनी वर्तवली आहे. त्यामुळे पुढील 3 दिवस मुंबईकराने पावसाचा अंदाज घेऊनच घराच्या बाहेर पडावे.

राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज-कोल्हापूर, पालघर, नाशिक, पुणे आणि रत्नागिरी जिल्ह्यांसाठी १४ जुलैपर्यंत मुसळधार पावसासाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. मुंबईसाठी पुढील ३ दिवसांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. मागील आठवड्यापासून राज्यभरात विविध ठिकाणी मुसळधार (Heavy rain) तर काही ठिकाणी संततधार पाऊस सुरू आहे. येणारे काही दिवस राज्यभर अश्याच पद्धतीने पाऊस राहणार आहे. तर राज्यातील पालघर,रायगड, कोकण आणि पुणे जिल्ह्यातील घाट परिसरात तसेच विदर्भातील अनेक जिल्हयात पुढील तीन दिवस रेड अलर्ट (Pune On Red Alert) देण्यात आला आहे. तर कोल्हापूर येथे देखील अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागाकडुन (Meteorological Department) देण्यात आला आहे.

रेन वॉटर हार्वेस्टिंग योजना अपयशी - 4 महिने पाऊस पडतो असे म्हटले जाते. मात्र, मुंबईमध्ये चार महिन्याचा पाऊस काही दिवसातच ( mumbai rain ) पडतो. यामुळे मुंबईमध्ये पाणी साचून ते पाणी समुद्राला जाऊन मिळते. समुद्रात जाऊन मिळणारे पाणी वाचवण्यासाठी पालिकेने रेन वॉटर हार्वेस्टिंग ही योजना राबवली पण ती फेल गेली आहे. तसेच, पाणी साठवण्यासाठी बोगदे बांधले जाणार होते. मात्र ते बोगदेही उभारण्यात आलेले नाहीत. समुद्रात वाहून जाणारे पाणी वाचवण्यासाठी महापालिकेकडे कोणतीही उपायोजना नाही. समुद्राला जाऊन मिळणारे पाणी वाचवल्यास मुंबईकरांना पाणी कपातीपासून मुक्ती मिळवणार ( corporation does not have any measures save rain water ) आहे.

हेही वाचा -Nagpur Scorpio Swept Away in Flood : स्कॉर्पिओ गेली पुराच्या पाण्यात वाहून; तीन जणांचा मृत्यू, तिघांचा शोध सुरू

Last Updated : Jul 13, 2022, 8:59 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details