मुंबई -मुंबई NCB चे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांचे वडील ज्ञानदेव वानखडे यांनी नवाब मलिक यांच्याविरोधात न्यायालयाचा अवमान याचिका दाखल (Wankhede Defamation case) केली होती. यावर आज मंगळवार (दि.07) रोजी सुनवणी झाली. याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने (Mumbai High Court) नवाब मलिक यांना फटकारले असून 10 डिसेंबरपर्यंत न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर (Mumbai HC on Nawab Malik ) करण्याचे सांगितले आहे. न्यायालयाने मनाई केली असतानाही मंत्री मलिक यांनी पुन्हा एकदा वानखडे यांच्यावर टीका केली आहे. यामुळे आता पुन्हा एका नव्या वादाला तोंड फुटले असल्याची चर्चा सुरु आहे.
Mumbai HC on Nawab Malik : नवाब मलिक यांना मुंबई उच्च न्यायालयाने फटकारले.. 10 डिसेंबरपर्यंत प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश - मुंबई उच्च न्यायालयाची नवाब मलिकांना नोटीस
मुंबई उच्च न्यायालयाने (Mumbai High Court) मनाई केल्यानंतरही नवाब मलिक (Nawab Malik) यांनी वानखेडे कुटूंबियावर (Wankhede Defamation case) टीका केल्याने न्यायालयाने त्यांना फटकारले आहे. उच्च न्यायालयाने नवाब मलिक यांना सवाल केला आहे की, त्यांच्याविरुद्ध कंटेम्प्ट ऑफ कोर्ट नोटीस का जारी करू नये. या प्रकरणी उत्तर देण्यासाठी न्यायालयाने नवाब मलिक (Mumbai HC on Nawab Malik) यांना 10 डिसेंबरपर्यंत मुदत दिली आहे.
Wankhede Defamation case
वानखडे यांच्या वकिलांनी मलिक यांना ३ डिसेंबर रोजी फेसबुकवर केलेली पोस्ट पुरावा (Wankhede Defamation case) म्हणून सादर केली. यावर नवाब मलिक हे मंत्री म्हणून बोलत आहेत, की वैयक्तिक हे कळायला हवं असे म्हणत न्यायमूर्तींनी नाराजी व्यक्त केली आहे. (Bombay HC issued notice to Nawab Malik) मलिक जर वैयक्तिक बोलत असतील तर त्यांना कोर्टात बोलवावं लागेल, असंही न्यायमूर्तींनी (Mumbai High Court) स्पष्ट केलं आहे.