मुंबई : उद्योगपती अनिल अंबानी (industrialist Anil Ambani) यांना 420 कोटींचा कर चुकवल्या प्रकरणी उच्च न्यायालयाने अंतरिम दिलासा (Mumbai High Court interim relief Anil Ambani) दिला आहे. अनिल अंबानी यांच्यावर 17 नोव्हेंबरपर्यंत कोणतीही कारवाई न करण्याचे आयकर विभागाला मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश (Mumbai HC directive Income Tax Department) दिले आहे. (Mumbai HC relief Anil Ambani)
न्यायालयाचे निर्देश -ब्लॅक मनी कायद्यांतर्गत रिलायन्स समूहाचे अध्यक्ष अनिल अंबानी यांना नोटीस पाठवण्यात आली होती. यातून दिलासा मिळावा याकरिता उद्योगपती अनिल अंबानी यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाने या प्रकरणी अनिल अंबानी यांना दिलासा दिला आहे. अनिल अंबानी यांच्यावर 17 नोव्हेंबरपर्यंत कोणतीही कारवाई न करण्याचे आयकर विभागाला निर्देश देण्यात आले. 420 कोटींचा कर चुकवल्याच्या प्रकरणात ही कारवाई केली जाणार होती.
420 कोटीची करचोरी-आर्थिक दिवाळखोरीची टांगती तलवार असलेल्या अनिल अंबानी यांच्या विरोधात आता काळा पैसा कायद्यातंर्गत कारवाईची टांगती तलवार आहे. आयकर विभागाने अनिल अंबानी यांच्याविरोधात खटला चालवण्याची परवानगी मागितली आहे. आयकर विभागाने स्विस बँकेतील अनिल अंबानी यांच्या खात्यातील 814 कोटी हून अधिक अघोषित संपत्तीवर 420 कोटींच्या करचोरी प्रकरणात आयकर खात्याने ही परवानगी मागितली आहे.
ब्लॅक मनी इम्पोजिशन ऑफ टॅक्स अॅक्टच्या खटल्याची शक्यता -अनिल अंबानी यांनी जाणीवपूर्वक करचोरी केली असल्याचा आरोप आयकर विभागाने केला आहे. अनिल अंबानी यांनी परदेशी बँकेत असलेल्या खात्यातील रक्कमेची माहिती भारतीय आयकर अथवा संबंधित विभागांना दिली नाही. याच प्रकरणी अनिल अंबानी यांना ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती. अनिल अंबानी यांच्याविरोधात ब्लॅक मनी इम्पोजिशन ऑफ टॅक्स अॅक्ट 2015 तील कलम 50 आणि 51 नुसार खटला चालवण्यात येऊ शकतो. या कलमानुसार दंडासह 10 वर्षांच्या कारावासाच्या शिक्षेची तरतूद आहे.