मुंबई - मुंबईत गेल्या वर्षीच्या मार्चपासून कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव आहे. महापालिका व आरोग्य विभागाच्या प्रयत्नामुळे रुग्ण संख्या कमी होत होती. मात्र, फेब्रुवारीपासून पुन्हा रुग्णसंख्या वाढू लागली आहे. मुंबईत सलग तीन दिवस सर्वाधिक तीन हजारावर रुग्ण आढळून आले होते. त्यानंतर आज सर्वाधिक रुग्णांची नोंद झाली आहे. आज मुंबईत 5185 रुग्णांची नोंद झाली असून 6 जणांचा मृत्यू झाला आहे. मुंबईत सर्वाधिक रुग्णांची नोंद होत असल्याने मुंबईकरांच्या चिंतेत भर पडली आहे.
हेही वाचा -कोल्हापूरच्या लेकीचा दिल्लीत डंका, नेमबाजी वर्ल्ड कप स्पर्धेत पटकावले रौप्य पदक
सर्वाधिक रुग्णांची नोंद -
मुंबईत आज 24 मार्चला 5185 रुग्ण आढळून आल्याने कोरोनाग्रस्तांचा आकडा 3 लाख 74 हजार 611 वर पोहचला आहे. आज 6 जणांचा मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा 11 हजार 606 वर पोहचला आहे. 2088 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आल्याने रुग्ण बरे होण्याची संख्या 3 लाख 31 हजार 322 वर पोहचली आहे. मुंबईत सध्या 30 हजार 760 सक्रिय रुग्ण आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 90 टक्के असून रुग्ण दुप्पटीचा कालावधी 84 दिवस इतका आहे. मुंबईत कोरोना रुग्ण आढळून आलेल्या 39 चाळी आणि झोपडपट्ट्या कंटेंनमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आल्या आहेत. तर 432 इमारती रुग्ण आढळून आल्याने सील करण्यात आल्या आहेत. कोरोना रुग्णांचा शोध घेण्यासाठी आतापर्यंत 37 लाख 94 हजार 500 चाचण्या करण्यात आल्या आहेत, अशी माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली.
हे विभाग हॉटस्पॉट -